महाराष्ट्र
पुण्यात वाहतूक वादातून हिंसक प्रकार:भरधाव स्कूटी चालकांकडून पोलिसांना धक्काबुक्की; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

- भरधाव गाडी चालवल्यानंतर सुरू असलेला वाद मिटवण्याचा प्रयत्न करणार्या पोलिस अंमलदारांना धक्काबुक्की करणार्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेर्वर सुंदर नटकले (२६), राहुल संजय साळवे (२३), रोहित अशोक डोंगरे (२७, सर्व रा. भिमनगर, विश्रांतवाडी, पुणे), सिध्दी कांबळे (२४, रा. साप्रस आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि हर्षल भोसले (२५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज बापूराव रणसिंग (३२, रा. घोरपडी बाजार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्कूटी व अन्य दुचाकी भरधाव वेगात चालवत असतना त्यांनी नंतर गाडी सुरज यांच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला. नंतर सुरज यांना हाताने मारहाण करत त्यांची चांदीची साखळी हिसकावण्याचे प्रयत्न केला. त्यावेळी छेडछाडीची तक्रार दाखल करेन अशी दमदाटी आरोपींनी केली. नंतर शिवीगाळ करून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तेथून जाणार्या अंमलदारांना आरोपींना समजवण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाच धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत सांगितले आहे. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी जागेच्या कंपाऊंडमध्ये घुसुन कामगारांना तसेच तक्रारदारांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुमन किसन बेलदरे, मधुकर शेजवळ, रोहीत शेजवळ, सुनिता बाळु शेजवळ, हरिदास पवार, महेश शिवाजी बेलदरे, आशितोष बेलदरे (सर्व रा. वडकी ता. हवलेली, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अमर मुरलीधर शेवाळे (४६, रा. मांजरी फार्म, शेवाळवाडी) यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार वडकी येथील गट क्रमांक १३५० येथे हा प्रकार घडला.