महाराष्ट्र

येरवडा भागात विवाहितेची आत्महत्या:माजी प्रियकराने पतीला पाठवले फोटो, मानसिक त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

  1. तरुणाच्या त्रासामुळे एका विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना येरवडा भागात घडली. तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तरुणासह त्याच्या पत्नी विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत विवाहित तरुणीच्या आईने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी पंकज रवींद्र पाटील, त्याची पत्नी रुपाली (दोघे रा. गोडबोले वस्ती, मांजरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहापूर्वी आत्महत्या केलेल्या तरुणीची आरोपी पंकज पाटील याच्याशी ओळख झाली होती. दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. विवाहानंतर तरुणीने त्याच्याशी असलेले प्रेमसंबंध तोडले होते. पाटीलने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. तरुणीच्या पतीच्या मोबाइल क्रमांकावर पाटीलने तरुणीबरोबर काढलेली छायाचित्रे पाठवली. या घटनेनंतर तरुणी मानसिक तणावाखाली होती. पाटील आणि त्याच्या पत्नीच्या त्रासामुळे तरुणीने नुकतीच गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणीच्या आईने नुकतीच याबाबत तक्रार दिली. त्यानंतर पाटील आणि त्याच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलिस निरीक्षक मिथुन सावंत पुढील तपास करत आहेत. तिसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू, ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल नियोजित झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील (एसआरए) इमारतीत काम करताना तोल जाऊन पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. बांधकाम मजुरास सुरक्षाविषयक साधने न पुरवून दुर्घटनेस जबाबदार असल्या प्रकरणी ठेकेदारासह दोघांविरुद्ध पर्वती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गेंदमाई रघुराई साकेत (वय २९, मूळ रा. कुचवाही, जि. सिधी, मध्य प्रदेश ) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याबाबत साकेत याच्या भावाने पर्वती पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, ठेकेदारासह सुरक्षाविषयक पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्वती दर्शन भागातील एका झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत गृह प्रकल्पाचे काम सुरू आहे. साकेत इमारतीत तिसऱ्या मजल्यावर काम करत असताना तोल जाऊन पडल्याने लिफ्टच्या मोकळ्या जागेत पडला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला.साकेत याला सुरक्षाविषयक साधने न पुरवणे, तसेच दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक एस. बी. कोपनर तपास करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button