राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का .ओबीसी मोर्चाचे विलास माळोदे यांच्या हाती घड्याळ

सिंदखेड राजा/ अनिल दराडे देऊळगाव राजा येथील भारतीय जनता पक्षाचे ओबीसी मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक यांनी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात प्रवेश केला
यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार पालकमंत्री मकरंद आबा पाटील सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे जिल्हा अध्यक्ष ॲड . नाझेर काझी ,माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे ,संतोष खांडेभराड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील ,सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते प्रवेश केला .
या वेळी विलास माळोदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे युवा आमदार मनोज कायंदे यांचा सर्व सामान्य जनतेशी असलेला थेट संपर्क ,व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोचण्यासाठी कार्यशैली वेगळी आहे .मी प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला असे ते म्हणाले .पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून पक्षवाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करेल असे माळोदे यांनी स्पष्ट केले.या पक्ष प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक सरचिटणीस नितीन कायंदे ,पक्षाचे देऊळगावराजा कार्याध्यक्ष प्रा .सदाशिव मुंढे ,अशोक मोगल ,अभय मोगल ,श्रीकांत सानप ,कैलास वायाळ यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते .