महाराष्ट्र

नीलम गोऱ्हे यांच्या घरी श्री गणेशाची प्रतिष्ठापना:गणरायाला घातले शेतकरी कल्याण, महिला सुरक्षा आणि राज्याच्या विकासाचे साकडे

गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर सिल्व्हर रॉक्स, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर येथील निवासस्थानी महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि त्यांची भगिनी जेहलम जोशी यांनी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. जवळपास ५० वर्षांची ही परंपरा त्यांच्या आई-वडिलांनी डॉ. दिवाकर गोऱ्हे व लतिका गोऱ्हे यांनी सुरू केली होती आणि आजही ती भावपूर्णपणे पुढे नेली जात आहे. या प्रसंगी घरातील आरास पर्यावरणपूरक ठेवण्यात आली होती. सोनेरी मोदकाद्वारे भारताच्या समृद्धीचे प्रतीक मांडले गेले, तर पाठीमागील धनुष्यबाण व त्रिशूलाच्या सजावटीतून सामर्थ्य आणि श्रद्धेचा संगम व्यक्त करण्यात आला. ही आरास केवळ सजावट नसून श्रद्धा, कृतज्ञता आणि प्रगतीची प्रार्थना असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना त्यांनी शेतकरी व सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाची मनोकामना केली. या वर्षी पाऊस समाधानकारक झाला असला तरी काही भागांत शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. बळीराजाला सुख-समाधान मिळो, शेतीच्या उत्पादनास योग्य भाव मिळो आणि नवी उभारी घेण्यासाठी बाप्पाचे आशीर्वाद लाभोत. तसेच विद्यार्थी, महिला आणि कामगार यांचे जीवन सुजलाम-सुफलाम व्हावे, असे त्यांनी नमूद केले. महिलांच्या सुरक्षिततेवर भर देत डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, ‘लाडकी बहीण योजना’ ही महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी महत्त्वाची दिशा आहे. गावपातळीवर महिलांना सुरक्षितता, नेतृत्व आणि प्रगतीची संधी मिळावी, ही आमची गणरायाकडे प्रार्थना आहे.ज्याच्या महायुती सरकारसाठी प्रार्थना करताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सर्वांगीण विकासाच्या मार्गावर आहे. या तिघा नेत्यांमध्ये कायम जिव्हाळा , मैत्री आणि सलोखा टिकून राहावा, जेणेकरून ते एकसंघपणे कार्य करून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतील. त्याचबरोबर, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक पातळीवर प्रगती व सामर्थ्य प्राप्त होवो, अशीही त्यांनी प्रार्थना केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button