वेरूळ लेणीच्या घाटात भीषण अपघात:ट्रक आणि आयशरची जोरदार धडक, टँकरखाली आल्याने दोघांचा जागीच मृत्यू; PHOTO

छत्रपती संभाजीनगर येथील प्रसिद्ध वेरूळ लेणीच्या घाटात भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. या अपघातामुळे वेरूळ लेणी मार्ग बंद करण्यात आला आहे. हा अपघात धुळे-संभाजीनगर या महामार्गावर झाला. अपघात झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. मोठा टँकर रस्त्यावर आडवा पडल्याने रस्ता बंद करण्यात आला असल्याचे समजते. आयशर टेम्पो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात टेम्पोखाली आल्याने दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एक पुरुष असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून दोघांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. टँकरखाली एक चारचाकी वाहनही दबले आहे, त्यामुळे चारचाकी कारचेही नुकसान झाल्याचं फोटोत दिसून येत आहे. वाहतूक पोलिसांनी बॅरिकेटस लावून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे. पोलीस व प्रशासनाकडून क्रेनच्या सहाय्याने हा टँक हटवण्याचे काम हाती घेण्यात आलं असून टँक हटवल्यानंतरच येथील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला जाईल.