सिंदखेडराजा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी घुगे

सिंदखेड राजा/ प्रतिनिधी – सिंदखेडराजा पंचायत समिती गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के पाटील यांची बदली जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे झाल्याने आज दि २९जुलै रोजी गटविकास अधिकारी म्हणून घुगे यांची नियुक्ती झाली
येथील गटविकास अधिकारी अंकुश म्हस्के हे गेल्या ,,, दिवसांपासून काम पाहात होते त्यांची कारकीर्द ही खूपच वाखाणण्याजोगी होती त्यांच्या काळात त्यांनी शैक्षणिक,आरोग्य, कुषी,सह सर्व च विभागात चांगले काम करून ग्रामीण भागातील गोरं, गरीब, शेतकरी, शेत मजूरासह खर्या लाभार्थ्यांना व सामान्य मानसाला न्याय देण्याचे काम केल्याने त्याची गरीबांचा अधीकारी म्हणून जनतेत त्यांची चांगली प्रतीमा तयार झाली होती पण अल्पावधीतच त्यांची बदली जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे तालूका कुळी आधीकारी म्हणून झाल्याने त्यांच्या जागी ,,,घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी आज गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे यावेळी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष भगवान पालवे,सरपंच रामकिसन नागरे सरपंच प्रकाश मुंडे विस्तार अधिकारी दराडे यांनी त्यांचा सत्कार केला