महाराष्ट्र

“धनंजय मुंडे यांनी कृषी विभागाची फाइल गायब केली!” – दमानियांचा स्फोटक आरोप

 महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथीचे वारे! अंजली दमानियांचे सनसनाटी दावे 

 

एनडीएमध्ये तणाव – शिंदेंचा भाव वाढणार, पण सप्टेंबरनंतर मोठा स्फोट!

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केलेले दावे सत्ताधाऱ्यांच्या चिंतेत भर टाकणारे ठरले आहेत.

 

दमानिया म्हणाल्या –

 

सत्ताधारी एनडीएमध्ये सर्वकाही आलबेल नाही!

 

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवाराला पुरेसे समर्थन मिळत नाही.

 

यासाठीच महाविकास आघाडीकडे हात पुढे करण्याची जबाबदारी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर टाकण्यात आली आहे.

 

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेट बैठकीलाही गैरहजेरी लावून स्वतःची ताकद दाखवली. त्यांचा भाव वाढणार, पण सप्टेंबरनंतर परिस्थिती कोणत्या दिशेने वळेल ते सांगता येत नाही!

 

 

 राज ठाकरे भाजपसोबतच जाणार – उद्धव ठाकरेंना टाकणार अडचणीत!

दमानिया यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भवितव्यावरही भाष्य करताना धक्कादायक दावा केला.

 

राज ठाकरे यांचे उद्धव ठाकरेंसोबत भवितव्य नाही, हे त्यांनाही ठाऊक झाले आहे.

 

ते लवकरच भाजपसोबत जातील आणि भविष्यात कधीतरी उद्धव ठाकरेंना अडचणीत आणतील.

 

भाजपसमोर आपली किंमत वाढवण्यासाठीच ते आत्ता वक्तव्य करत आहेत, अन्यथा त्यांची शिवसेनेसोबत जाण्याची अजिबात तयारी नाही!

 

 

 कृषी घोटाळ्यावर पुन्हा स्फोट – धनंजय मुंडेवर गंभीर आरोप!

फक्त राजकीय समीकरणांवरच नव्हे तर कृषी विभागातील भ्रष्टाचारावरही अंजली दमानियांनी बॉम्ब टाकला!

 

मंत्री धनंजय मुंडे यांनी कृषी सचिव व्ही. राधा यांनी दिलेली महत्त्वाची फाइल गायब केली आहे, असा थेट आरोप दमानियांनी केला.

 

या घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा कृषी विभागातील भ्रष्टाचार चर्चेत आला असून, मुंडे अजूनही शांत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button