संपादकीय

पहाट फाउंडेशनचा उत्कृष्ट राज्यस्तरीय पत्रकारितेचा पुरस्कार सचिन खंडारे यांना प्रदान

बुलडाणा/ प्रतिनिधी

पर्यावरण संवर्धनासाठी राज्यभर काम करणाऱ्या पहाट फाउंडेशन च्या वतीने दिनांक 28 जून रोजी बुलढाणा येथील सामाजिक न्याय भवन सभागृहामध्ये राज्यस्तरीय पर्यावरण संवर्धन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, चार सत्रामध्ये मध्ये चाललेल्या या कार्यक्रमांमध्ये शेवटच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले . यामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये नवा ठसा उमटवणारे सचिन मधुकर खंडारे यांना पत्रकारितेबद्दल राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले ,
यामध्ये सन्मानपत्र आकर्षक ट्रॉफी व काजूचा वृक्ष भेट म्हणून देण्यात आला ‘ सचिन खंडारे यांनी लेखणीच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कष्टकरी विद्यार्थी मजूर वर्ग अपेक्षित घटकांना न्याय देण्याची भूमिका आपल्या लेखणीच्या माध्यमातून मांडली आहेत . याच कार्याची दखल पहाट फाउंडेशन ने घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला आहे . सदर पुरस्कार प्रदान करताना मेहकर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात ‘ मिसेस इंडिया सौ श्वेता परदेशी ‘ महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे डॉक्टर गेडाम ‘ सचिन देवरे ‘ पहाट फाउंडेशनचे संचालक अमोल बीलंगे ‘ पहाटच्या संचालिका अर्पिता सुरडकर आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी पुरस्कार देण्यात आला . सदर मिळालेल्या पुरस्कारामुळे सर्व बुलढाणा जिल्ह्यातून परिसरातून सचिन खंडारे यांच्यावर अभिनंदन यांचा वर्षाव होत आहे . पत्रकरिता क्षेत्रातील त्यांना मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे आतापर्यंत त्यांना सामाजिक व इतर कार्यासाठी दहा पुरस्कार मिळालेले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button