महाराष्ट्र

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नि:पक्षपातीपणे आणि नियमानुसार क्षेत्ररचना व्हावी राष्ट्रवादीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

देऊळगाव राजा : देवानंद झोटे
बुलढाणा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नि:पक्षपाती पण यांनी नियमानुसार क्षेत्र रचना व्हावी. तसेच देऊळगाव राजा नगरपरिषद हद्दीत प्रशासनातील अप्रत्यक्ष राजकीय हस्तक्षेप थांबवावा. अशी मागणी आज 8 जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची पडघम आता वाजू लागले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक निपक्ष व विश्वासार्ह झाली पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक प्रकारचे गंभीर अनुसूचित प्रकार उघड झाले होते. मतदार यादीतील अनियमितता, मुस्लिम व मागासवर्गीय मतदारांची नावे योजनाबद्ध पद्धतीने हटवणे, मतदारांचे जबरदस्तीने स्थलांतर, वाढीव बनावट किंवा बाहेरून आणलेली मतदार अशा प्रकारच्या घटना निवडणूक प्रक्रियेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. यामुळे प्रशासनातील निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता राहत नाही. मात्र निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांची पूर्तता होणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी कोणत्याही पक्षाच्या प्रभावाखाली काम करू नये. नगरपालिकेच्या प्रभाग रचना, जिल्हा परिषदेच्या गण रचना, पंचायत समितीच्या गट रचना या निवडणूक प्रक्रियापूर्वी पार पडणाऱ्या महत्त्वाच्या बाबीही निपक्ष असणे आवश्यक आहे. या सर्व प्रक्रिया सत्ताधाऱ्यांच्या कोणत्याही दबाव किंवा आमिषाला बळी न पडता पारदर्शकतेने पार पाडल्या गेल्या पाहिजे. अशी आढळून आल्यास त्यांची तत्काळ चौकशी व्हावी आणि गरज असल्यास कार्यवाही केली जावी,आशी मागणी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,प. स. चे माजी सभापती हरीश शेटे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पवार, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, राष्ट्रवादीचे नेते गणेश सवडे, गणेश गुरुकुल, शिवाजीराव कोल्हे, नवनाथ गोंमधरे, इस्माईल बागवान,सै. करीम, रफिक पठाण,नासेर फ्रुटवाले,भिकाजी निलख, विलास खराट,आदींनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button