मतचोरीचं मोठं सत्य – भाजपचेच गडकरी झाले साक्षीदार!”

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच नागपूर मतदारसंघातील साडेतीन लाख मतदारांची नावे वगळल्याचे कबूल केले. यात नातेवाईकांचाही समावेश. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर व नेते विजय वडेट्टीवार यांचा फडणवीसांवर जोरदार हल्ला. मतचोरीच्या आरोपावरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला.
मित्रांनो, निवडणुकीत मतचोरी होत असल्याचा आरोप जर काँग्रेस नेते राहुल गांधी करतात, तर भाजपचे मुख्यमंत्री फडणवीस लगेच त्यांना “चिप चोरी, हार्ड डिस्क करप्ट” अशा उपहासाने हिणवतात.पण… पण… यावेळी तर स्वतः भाजपचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच मतदार याद्यांतील घोळ कबूल केला आहे!
📌 काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी गडकरींचा व्हिडिओ शेअर करून भाजपला अक्षरशः कोंडीत पकडलंय.
गडकरी या व्हिडिओत सांगतात – “माझ्या नागपूर मतदारसंघातील तब्बल साडेतीन लाख मतदारांची नावे वगळली गेली होती, यात माझे नातेवाईकही होते!”अरेरे! म्हणजे आता हा आरोप राहुल गांधींचा नाही, तर गडकरींचाच झाला बरं का!
🔥 यशोमती ठाकूरचा तिरका बाण
“ये अंतर की बात, गडकरी जी सत्य के साथ” म्हणत ठाकूर यांनी भाजप कार्यकर्त्यांना हाक दिली – राहुल गांधींना खोटं ठरवणाऱ्यांनो, आता गडकरींचा व्हिडिओ पाहा आणि बोला!
💥 वडेट्टीवारांचा स्फोटक सवाल
“गडकरींची चिप खराब झाली का? डिस्क करप्ट झाली का? जे फडणवीस निवडणूक आयोगाचं समर्थन करत होते, ते आता गडकरींना काय उत्तर देतील?”
गडकरींच्या नातेवाइकांची नावं गायब होऊ शकतात, तर सामान्य मतदारांचं काय होणार? कुठे मतदार वाढवले जात आहेत, कुठे कमी – हेच तर मतचोरीचं मोठं चित्र आहे, असं वडेट्टीवारांचे थेट वार!
⚡ मोठा प्रश्न उरतोच…
निवडणूक आयोग आता गडकरींकडून प्रतिज्ञापत्र मागणार का? पुरावे मागणार का? की माफी मागणार?
कारण आता ही गोष्ट भाजपवालेही “सत्य आहे” असं म्हणतायत!