माजी नगराध्यक्ष स्व. कमलताई मेहेत्रे यांची जयंती विविध उपक्रमाने साजरी

सिंदखेडराजा/प्रतिनिधी सिंदखेडराजा नगरीच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ कमलताई छगनराव मेहेत्रे यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण स्वच्छतांना कपडे वाटप दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
सिंदखेडराजाशहरातील माजी नगराध्यक्ष स्वर्गीय कमलताई छगनराव मेहेत्रे यांचा 58 वा जयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वप्रथम सकाळी साडेनऊ वाजता जिजामाता राजवाडा समोर भव्य अभिवादनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळीशहरातील नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष देविदास भाऊ ठाकरे माजी नगराध्यक्ष विष्णूभाऊ मेहेत्रे, माजी नगराध्यक्ष सतीश तायडे, माजी उपाध्यक्ष विजुभाऊ तायडे, माजी उपाध्यक्ष दिलीप आढाव माजी स्वच्छता व आरोग्य सभापती राजेंद्र आढाव बांधकाम सभापती गणेश झोरे माजी पाणीपुरवठा सभापती बालाजी मेहेत्रे उबाठाचे युवा नेते योगेश म्हस्के, उबाठाचे शिवाजीराव ठाकरे वागले राष्ट्रवादीचे युवा नेते संजय मेहेत्रे माजी नगरसेवक व विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच गावकरी मंडळी या अभिवादन सोहळ्यासाठी उपस्थित होते या सोहळ्यानंतर खंडोबा मंदिर परिसरात फळ वृक्षाचे लागवड करण्यात आली.
यावेळीराष्ट्रवादीचे नेते प्रकाश गीते, शिवसेनेचे नेते दीपक बोरकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र अंभोरे,राष्ट्रवादीचे युवा नेते अरविंद खांडेभराड भाजपाचे युवा नेते अशोक मेहेत्रे भाजपाचे शहराध्यक्ष अड संदीप मेहेत्रे बाळूमामा संस्थानचे संचालक गैनाजी मेहेत्रे तुळशिराम झोरे,माजी सैनिक तुकाराम चौधरी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते .
यानंतर दुपारी अडीच वाजता संत सावता भवन या ठिकाणी सिंदखेड राजा नगरपरिषदेतील स्वच्छता दूताना साडी व ड्रेसचे वाटप करण्यात आले तसेच दहावी व बारावी मधील गुणवंत 27 विद्यार्थ्यांचा माजी मंत्री डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थित माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा प्रवक्ते विनोद भाऊ वाघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह पेनचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी ह भ प सखाराम आढाव, पंचायत समितीचे माजी सभापती शिवाजी राजेजाधव युवा सेना उपजिल्हाप्रमुख आतिश तायडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा नेते योगेश म्हस्के माजी उपाध्यक्ष दिलीप आढाव राष्ट्रवादीचे श्याम मेहत्रे शिवसेनेचे सुदाम काकड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ माजी सैनिक फकीरा शेठ जाधव सतीश काळे सिद्धेश्वर आंधळे संजय मेहेत्रे शिवाजी वागळे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा नेते योगेश म्हस्के भाजपा शहराध्यक्ष ॲड संदीप मेहेत्रे संजय मेहेत्रे शिवाजी ठाकरे वागले विजय शेरे यांनी अथक परिश्रम घेतले
सिंदखेड राजा नगरपरिषद परिषदेच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ कमलताई छगनराव मेहेत्रे यांनी 2004 ते 2009 च्या कार्यकाळात विविध विकास काम करीत शहराच्या विकासाची मुहूर्तमेढ रोवली मिळवल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केले
स्व. कमलताईचे स्वप्न मुलीने पूर्ण करावे माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर
स्व. कमलताईचे नगराध्यक्षाच्या कार्यकाळातील अपूर्ण राहिलेली स्वप्न त्यांची मुलगी अश्विनीने समोर येऊन पूर्ण करावे असे प्रतिपादन गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी बोलताना माजी आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले.