मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाची ‘शाश्वत भेट’! बीबी गावात भाजप कार्यकर्त्यांकडून मशानभूमीत वृक्षारोपणाचा आगळा-वेगळा उपक्रम

लोणार /भागवत आटोळे तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे समजले जाणारे बीबी गाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारणच तसंच होतं! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजप नेते मा. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, बीबी गावात भाजप व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. गोपाल काबरा यांच्या संकल्पनेतून एक अनोखा, भव्य आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला.
साजरे करावेत असे वाढदिवस असावेत! कोणतेही मोठे बॅनर, ढोल-ताशे, खर्चिक साजशृंगार न करता, फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मशानभूमीत व इतर सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. “शाश्वत भेट” म्हणून एका कार्यकर्त्याने वृक्षारोपण करत मा. फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला
या वेळी गावातील भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रमंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांचा सहभाग आणि उत्साह इतका ओसंडून वाहत होता की, प्रत्येकाच्या हातात रोपं आणि चेहऱ्यावर समाधानाचे हास्य होते.
कार्यक्रमानंतर चहा-नाश्ता करून एकोप्याचे, सेवाभावी वातावरण तयार करण्यात आले.
“नेते म्हणून नव्हे, तर सेवक म्हणून काम करणाऱ्या फडणवीस साहेबांना ही खरी शुभेच्छा!” अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून लोकांच्या मनात घर करणाऱ्या अशा उपक्रमामुळे बीबी गावातील भाजप कार्यकर्त्यांची सर्वत्र स्तुती होत आहे.
हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत असून, वाढदिवस साजरा करण्याची ही ‘शाश्वत भेट’ चळवळीचे रूप घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.