आर्थिक
हुमणी आळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी तहसील कार्यालयात निवेदन सादर; पंचनाम्याची जोरदार मागणी

देऊळगाव राजा (ता.प्रतिनिधी) – देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा, शिवनी आरमाळ, पिंपरी आंधळे, मेंडगाव, बायगाव व परिसरातील शेतकऱ्यांनी हुमणी आळीच्या प्रचंड प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात मदतीची मागणी करत आज दिनांक 21 जुलै रोजी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ मॅडम .व नायब तहसीलदार सायली जाधव.व तालुका कृषी अधिकारी कचवे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्त्या सौ. भारती अमोल इंगळे यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची नावे, सह्या व गट क्रमांक गोळा करून सविस्तर निवेदन तयार करण्यात आले. कापूस, सोयाबीन, तूर यासारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
निवेदनातील प्रमुख मागण्या:
- हुमणी आळीग्रस्त गावांमध्ये कृषी विभागाने तात्काळ पाहणी करावी.
- पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जावी.
- हुमणी किडीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना त्वरित राबवाव्यात.
शेतकऱ्यांच्या वतीने पत्रकार नंदकिशोर देशमुख (दैनिक (महाभूमी) व पत्रकार हनीफ शेख (पुण्यनगरी) यांनीही जनजागृती व नोंदणीसाठी मोठा पुढाकार घेतला होता. अनेक शेतकऱ्यांनी घरपोच किंवा शेतातच भेट देऊन आपली नावे व सह्या नोंदवल्या.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी निवेदन देताना . रामदास डोईफोडे काँग्रेस तालुका अध्यक्ष. देऊळगाव राजा. केशव सानप तालुका काँग्रेस उपाध्यक्ष भास्कर वाघ. माजी तंटामुक्ती अध्यक्ष अंढेरा तसेच मेंडगाव येथील सिताराम राघोजी घुगे. शब्बीर खान पठाण. बबन पालवे . भास्कर वाघ व गजानन ढाकणे. विकास कांयदे लखन जोहरे. दिनकर देशमुख. अशोक काळुसे. भास्कर गीते. संतोष पालवे. जीवन कणखर.व अंढेरा सर्कलमध्ये बरेचसे शेतकरी हजर होते.