वित्तीय शहाणपणाची पायाभरणी –देऊळगाव (मही) येथे मनिवाईज वित्तीय साक्षरता कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न”

देऊळगावराजा/प्रतिनिधी
ग्रामीण भागातील नागरीकांमध्ये वित्तीय शिस्त, बचतीची सवय, शासकीय योजनांची माहिती व उपयोग यासाठी मनिवाईज वित्तीय साक्षरता कार्यशाळा देऊळगाव (मही) येथील बौद्ध विहार येथे पार पडली.
या कार्यशाळेचे आयोजन रिझर्व बँक ऑफ इंडिया अंतर्गत, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बुलढाणा प्रायोजित, नाबार्ड च्या सहकार्याने व ऍक्सिस फाउंडेशन अंमलबजावणी संस्थेमार्फत करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा अग्रणी व्यवस्थापक (Lead District Manager – LDM) मा. श्री. के. के. सिंह,
ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योत्स्ना वासुदेवराव शिंगणे,
उपसरपंच सौ. वनिता विवेक खिल्लारे,
माजी सरपंच श्री. अनंता इंगळे,
सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा व्यवस्थापक मा. अमित चौके,
असिस्टंट मॅनेजर श्री. अभिजित ढाकणे,
उमेद प्रकल्पाचे ब्लॉक मॅनेजर श्री. शुभम आघाव,
सहकारी श्री. स्वप्नील जिलडवार
हे मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेत शासकीय योजनांबाबत माहिती देण्यात आली. त्यात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PM-SBY),
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PM-JJBY),
सुकन्या समृद्धी योजना,
अटल पेन्शन योजना,
सिबिल स्कोअर,
बचत खाते,
कर्ज प्रक्रिया व तक्रार निवारण प्रणाली आदी विषयांचा समावेश होता.
गावातील महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यशाळेला भरभरून प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीएफएल (CFL) टीममधील क्षेत्र समन्वयक श्री. सुरेंद्र कहाळे यांनी केले.
केंद्र व्यवस्थापक (Center Facilitator) श्री. गणेश गावंडे, मेहकर यांनी उपस्थितांना माहिती व मार्गदर्शन दिले.
या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन रिजनल मॅनेजर मा. श्री. आकाश मेहत्रे यांचे लाभले.
अॅडिशनल डिस्ट्रीक्ट मॅनेजर (ADM) मा. के. के. सिंह, बुलढाणा यांनी आपल्या भाषणात,
“शासकीय योजना व बँकिंग सुविधांचा योग्य वापर केल्यास, सामान्य माणूस देखील आपल्या जीवनातील आर्थिक चिंता बाजूला ठेवून सुशांत व सुरक्षित जीवन जगू शकतो,” असा सकारात्मक संदेश उपस्थितांना दिला.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन व अंमलबजावणीसाठी बिएम एमआईएस उमेद अभियान श्री प्रवीण गुलापेल्ली सर यांच्या सह
आयसीआरपी (ICRP) म्हणून कार्यरत
सौ. शारदा शिंगणे
सौ. प्रतिभा शिंगणे
सौ. स्वाती शिंगणे
सौ. वर्षा भोरजे
सौ. मेघा हिवाळे
सौ. निलोफर शेख सादिक
एएलसीपी (ALCP) – सौ. छाया हिवाळे
तसेच प्रभाग संघ नेत्या – नाजीमाताई यांनी परिश्रमपूर्वक भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी शिंदखेडराजा क्षेत्र समन्वयक श्री. योगेश इंगळे यांनी उपस्थित मान्यवर व महिलांचे आभार मानले.