प्रा. दिलीपराव झोटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटात) थेट उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पक्षप्रवेश;

मुंबई / देवानंद झोटे
बुलडाणा जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत, देऊळगाव राजा तालुक्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते प्रा. दिलीपराव झोटे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात मुंबईत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला.
हा पक्षप्रवेश म्हणजे केवळ एक नेता नव्हे, तर राजकीय जनसामर्थ्याचा लोंढा पक्षात दाखल झाला, असेच म्हणावे लागेल! झोटे सरांसमवेत प्रकाश काकडे, बबनराव कासारे, अनिल साळवे, सुरेश मगर, पंढरी म्हस्के यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र पक्षात प्रवेश करत तालुक्याच्या राजकारणात नवा अध्याय सुरू केला.
प्रसंगी उपस्थित मान्यवर –
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे
बुलडाण्याचे पालकमंत्री मकरंद आबा पाटील
आमदार मनोज कायंदे
जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काझी
…यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी झोटे सरांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले.
प्रा. दिलीपराव झोटे यांचे उद्गार –
“मी पक्षनेते अजितदादांच्या नेतृत्वावर नितांत श्रद्धा ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहे. देऊळगाव राजा तालुक्यांत पक्ष बळकट करण्यासाठी सर्वस्व पणाला लावेन!”
राजकीय विश्लेषकांचे मत –
प्रा. झोटे यांच्या प्रवेशामुळे तालुक्याच्या राजकारणाचा पल्ला बदलणार हे निश्चित मानले जात आहे. यामुळे विरोधकांची समीकरणं ढवळून निघणार असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रा. झोटे यांचा पक्षप्रवेश म्हणजे फक्त एका व्यक्तीचा नव्हे, तर जनतेचा आणि विचारांचा प्रवेश आहे! देऊळगाव राजा तालुक्याच्या राजकीय नकाशावर आता नव्या उर्जेने राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व जाणवू लागले आहे!