Uncategorized

अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनात राष्ट्रीय पुरस्कार देण्याची डॉ.उज्जैनकर यांची घोषणा

जळगाव /बबनराव वि.आराख शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव यांची झुम मीटिंग नुकतीच दिनांक ५ जुलै २०२५ रोजी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांचे अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी यांनी होऊ घातलेल्या संमेलनाचे विषय सर्वांसमोर वाचून दाखवले , यावेळी डॉ. उज्जैनकर म्हणाले की, फाउंडेशनचे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात येत असून. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये यापुढे तापी पूर्णा राष्ट्रीय पुरस्काराने विविध क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनिय कार्याबद्दल सन्मानित करणार असल्याचे असेही संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केले. ते पुढे म्हणाले की,आतापर्यंत शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पाच राज्यस्तरीय व तीन अखिल भारतीय शिव मराठी साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन केलेले असून यामध्ये असंख्य शिक्षक,साहित्यिक, समाजसेवक,पत्रकार, निवेदक,उत्कृष्ट वक्ता यांना तापी पूर्णा राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवलेले आहे. याप्रसंगी फाउंडेशनचे राज्य अध्यक्ष छत्रपती संभाजी नगर येथील डॉ.सुभाष बागल यांनी कल्याण संमेलन आणि डॉ.उज्जैनकर यांनी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केल्याबद्दल अभिनंदन करून विशेषांकाच्या संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले. हे संमेलन यशस्वी कसे होईल यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रत्येकांने प्रयत्न करावा अशी सुद्धा त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली त्यानंतर फाउंडेशनच्या राज्य समन्वयक तथा भरारी प्रकाशाच्या प्रकाशिका मुंबई येथील सौ.लताताई गुठे यांनी सुद्धा या संमेलनाच्या संदर्भात आणि विशेषांका संदर्भात आपले मनोगत व्यक्त केले आणि राज्य पुरस्कारा सोबतच राष्ट्रीय पुरस्काराचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शिवचरण उज्जैनकर यांनी जाहीर केल्याबद्दल त्यांनी खूप खूप अभिनंदन केले त्यानंतर फाउंडेशनचे राज्य सहसचिव कोल्हापुर येथील डॉ. मा. ग.गुरव यांनी डॉ . उज्जैनकर यांनी राष्ट्रीय पुरस्कार देण्याची घोषणा केल्याबद्दल त्यांनी डॉ. उज्जैनकर यांचे अभिनंदन केले. फाउंडेशनचे राज्याध्यक्ष डॉ. सुभाष बागल फाउंडेशनचे राज्य खजिनदार साखरखेर्डा येथील कवी रामदास कोरडे फाउंडेशनचे राज्य सहसचिव कोल्हापूर येथील डॉ. मा.ग.गुरव फाउंडेशनचे राज्य समन्वयक मुंबई येथील सौ. लताताई गुठे राज्य संपर्कप्रमुख अमरावती येथील डॉ. मंदाताई नांदुरकर राज्य उपाध्यक्ष न्हावी येथील ललितकुमार फिरके राज्य सल्लागार पुणे येथील बाळकृष्ण अमृतकर पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिव पुणे येथील रामचंद्र गुरव पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटक बार्शी सोलापूर येथील अशोक मोहिते पुणे जिल्हा उपाध्यक्ष जगन्नाथ बुडूखले गुरुजी बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शाहीर मनोहर पवार बुलढाणा जिल्हा अध्यक्ष खामगाव येथील शंकरराव अनासुने बुलढाणा जिल्हा समन्वयक बाळूभाऊ ईटणारे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा पूजाताई खेते बुलढाणा जिल्हा जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मधुकर पोतदार जळगाव जिल्हा सचिव प्रवीण वारके जळगाव जिल्हा संघटक विनायक वाघ कोल्हापूर येथील डॉ. सविता व्हटकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व उपस्थितानी आजच्या झूम मीटिंगच्या विषयावर आपले मनोगत व्यक्त करून समाधान व अभिनंदन केले. मीटिंगचे आभार उज्जैनकर फाउंडेशनचे उत्तर महाराष्ट्र विभागीय सचिव गणेश कोळी सर यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button