महाराष्ट्र

नाशिक हादरलं! सोशल मीडियावर बदनामी – अल्पवयीन मुलीचा आत्महत्येचा टोकाचा निर्णय!

नाशिक / प्रतिनिधी मानवी मूल्यांना काळिमा फासणारी, समाजमन हादरवणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमसंबंध ठेवण्यासाठी दबाव, सोशल मीडियावर बदनामी, अश्लील शिवीगाळ आणि सततचा मानसिक छळ सहन करावा लागला. या अमानवीय अत्याचारांना कंटाळून तिने अखेर आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी झोपडपट्टी तपोवन येथील गणेश भांगरे (२०), अक्षय मदन वरठे (२१), अतिष राजकुमार वैद्य यांनी कटकारस्थान रचून पीडित मुलीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. इतकेच नव्हे तर तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये घुसून बनावट पोस्ट टाकत तिचा खोटा प्रेमसंबंध असल्याचा प्रचार केला. या घृणास्पद कृतीमुळे मुलीची कॉलेज व समाजात बदनामी झाली आणि मानसिक छळ सहन न झाल्याने तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

यात आरोपींनी केवळ बदनामीच नाही, तर फोनवरून अश्लील शिवीगाळ, धमक्या आणि अपमानास्पद मजकूर पसरवत तिच्या आयुष्याशी निर्दय खेळ केला. मुलीच्या आत्महत्येस जबाबदार असलेले हे आरोपी समाजाला कलंक असून त्यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणी संतप्त नातेवाईक व समाजातून होत आहे.

या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, नागरिकांतून रोष व्यक्त होत आहे की –
“मुलींवरील अशा अत्याचार करणाऱ्यांना कायद्याने वेळीच धडा शिकवला नाही, तर उद्या प्रत्येक घर हादरेल!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button