पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी:लक्ष्मण हाके यांची बोचरी टीका; अजित पवार ठेकेदार, भांडवलदारांचे नेते असल्याचा आरोप

🔥 महाराष्ट्रात नवे राजकीय वादळ! 🔥
पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी शनिवारी रात्री पवार कुटुंबावर जबरदस्त हल्ला चढवला.
“पवार कुटुंब म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी!” अशी थेट उपमा देत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमी सत्तेत बसणाऱ्या या घराण्यावर टीकेची झोड उठवली.
हाके म्हणाले –
➡️ अजित पवार हे शेतकरी–श्रमिकांचे नाही, तर ठेकेदार, कॉन्ट्रॅक्टर, भांडवलदारांचे नेते आहेत.
➡️ सुप्रिया सुळे यांना संसदेतून किती वेळा सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवल्यामुळे नव्हे, तर फक्त “वडिलांच्या मायलेजवर” संसदरत्न पुरस्कार मिळतो, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
➡️ महाराष्ट्राच्या राजकारणात कोणतीही सत्ता आली तरी तिजोरीच्या चाव्या पवारांच्या हातातच राहतात, असा घणाघात त्यांनी केला.
⚡ मराठा–ओबीसी समीकरणांवर इशारा ⚡
मनोज जरांगे यांच्यावर टीका करताना हाके म्हणाले –
“आरक्षण संविधानाने मिळतं, दादागिरीने नाही! जरांगे मराठा–ओबीसी संघर्ष पेटवू पाहत आहेत. मुख्यमंत्री सावध राहिले नाहीत तर मोठा संघर्ष उभा राहू शकतो!”
👉 दरम्यान, हाके यांच्या या संतप्त वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या मराठा–ओबीसी वादळाचे संकेत दिसत आहेत.
👉 पवार कुटुंबाकडून या टीकेवर काय प्रतिक्रिया येते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
—