विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा स्फूर्ती निर्माण करणारी ऐतिहासिक सहविचार सभा संपन्न

सिंदखेडराजा, ता. 25 जुलै (प्रतिनिधी) :
सिंदखेडराजा तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या क्रीडा क्षमतांना नवे पंख देण्यासाठी आणि तालुकास्तरीय क्रीडा महोत्सवाचे नियोजन निश्चित करण्यासाठी तालुका क्रीडा संकुल, सिंदखेडराजा येथे एक भव्य क्रीडा सहविचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेच्या अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार श्री प्रवीणकुमार . वराडे हे होते.
गटशिक्षणाधिकारी श्री. स्वप्निल निकम, विस्तार अधिकारी श्री. गावडे, केंद्रप्रमुख अरुण खेडेकर, केंद्रप्रमुख गैबीनंद घुगे, तालुका क्रीडा समन्वयक उद्धव नागरे, सह-समन्वयक संतोष नागरे व तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत 28 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2025 दरम्यान होणाऱ्या 14 वर्षाखालील व त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे सविस्तर नियोजन करण्यात आले.
🔸 श्री. उद्धव नागरे सर यांनी ११ क्रीडा प्रकारांची सविस्तर माहिती, विद्यार्थ्यांसाठीच्या अटी व शर्तींचे सादरीकरण केले.
🔸 गटशिक्षणाधिकारी श्री. निकम साहेबांनी सर्व शाळांनी आपल्या खेळाडू विद्यार्थ्यांचा सहभाग अनिवार्य करण्याचे निर्देश दिले, आणि खेळातून होणाऱ्या सर्वांगीण विकासावर भर दिला.
🔸 त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उदाहरणे देत, विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे मार्गदर्शन केले.
सभेचे अध्यक्ष श्री. वराडे साहेबांनी प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन दिले व विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी क्रीडा शिक्षकांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गैबीनंद घुगे सर,
प्रास्ताविक उद्धव नागरे सर,
तांत्रिक बाबींचे विवेचन संतोष नागरे सर,
आणि आभारप्रदर्शन कविवर्य डोईजड सर यांनी केले.
या प्रेरणादायी सहविचार सभेच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवून क्रीडा संस्कृतीला बळकटी दिली.
विशेष नोंद:
सिंदखेडराजा तालुक्यातील प्रत्येक शाळेतील विद्यार्थी आता केवळ शिक्षणातच नव्हे, तर क्रीडाक्षेत्रातही राज्यपातळीवर चमकणार, याची ही सहविचार सभा ठरली ग्वाही!