महाराष्ट्र

राजकारण करीत असताना डोक्यावर बर्फ , तोंडात साखर आणि पायाला भिंगरी बांधून काम करणाऱ्याला जनता स्विकारते  उबाठा तालुका प्रमुख महेंद्र पाटील यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्यात ना . प्रतापराव जाधव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 

 साखरखेर्डा ( दर्शन गवई ) आम्ही उध्दव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वेगळा केला . सत्तेत असून पक्षांतील कार्यकर्त्यांची कामे होत नव्हती . हळूहळू शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसने संपविण्याचा प्रयत्न केला होता . शिवसेना जिवंत ठेवण्यासाठी आम्ही जो निर्णय घेतला तो योग्यच होता . हे जनतेला सुध्दा पटले होते . म्हणून पुन्हा शिवसेना केंद्रात आणि राज्यात सत्तेवर आहे . काही आमचेच कार्यकर्ते दुधा मनस्थितीत होते . ते थांबले परंतू त्यांना आपली चुक कळली आणि ते पुन्हा आमच्या सोबत घर वापसी करीत आहेत . महेंद्र पाटील हे घराणे मूळचे शिवसेनेचे आहे , आजही ते शरीराने उबाठा सोबत असले तरी मनाने मात्र आमच्या सोबत होते . आज त्यांचा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा होत असताना त्यांच्यावर प्रेम करणारे शेकडो शिवसैनिक प्रवेश सोहळ्यात सहभागी झाले . राजकारण करीत असताना डोक्यावर बर्फ, तोंडात साखर आणि पायाला भिंगरी बांधून काम करणाऱ्याला जनता स्विकारते ते गुण पाटील घराण्यात आहे . असे विचार केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी साखरखेर्डा येथील पक्ष प्रवेश सोहळ्यात मांडले . 

श्री पलसिध्द महास्वामी मठात आज शेकडो शिवसैनिकांचा पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर हे होते . तर जिल्हा प्रमुख बळीराम मापारी , उपजिल्हाप्रमुख बाबुराव मोरे , धनशिराम शिंपणे , अतिष तायडे , युवासेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव , तालुका प्रमुख वैभव देशमुख , देऊळगाव राजा तालुका प्रमुख सुदाम काकड , शिवसेना नेते योगेश जाधव , अनिल चित्ते , नरेंद्र डिघोळे , मायावती म्हस्के , गंभिरराव खरात , दामुआण्णा शिंगणे , अशोक खरात , अनंता शेळके उपस्थित होते . 

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची पक्ष बांधणी करताना गाव तेथे शाखा आणि शिवसेना सभासद नोंदणी करण्यासाठी सर्वांनी सहभागी व्हावे . ज्यांना पक्षाचे काम करण्यासाठी वेळ नसेल त्यांनी आपली जबाबदारी दुसऱ्याकडे द्यावी . स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये शिवसेना महायुती सोबत लढणार आहे . परंतू सन्मान जनक युती झाली नाही तर स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी तयार रहा असा सल्ला माजी आमदार डॉ शशिकांत खेडेकर यांनी अध्यक्षीय भाषणात दिला . 

माजी सरपंच तथा उबाठा तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देऊन शिवसेना पक्षात प्रवेश केला ते महेंद्र पाटील यांच्या सोबत सवडद येथील माजी सरपंच शिवाजी लहाने , माजी पंचायत समिती सदस्य शेख शफी शेख गुलाब , अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष मुज्जफर हुसेन सिद्दीकी , वडार समाजाचे अध्यक्ष राजू डुकरे , दत्ता लष्कर , मातंग समाजातील कार्यकर्ते , सुदाम देशमुख , बबन तुपकर , प्रमोद तुपकर , बंडू ठाकूर , रामेश्वर जाधव , मनोहर काटे , गजानन काटकर , महेश भुजंगराव शिंगणे , मनशुर शहा ठेकेदार , गोपाल भिमराव शिराळे , गजानन शिराळे , बबन मुदमाळी , माजी प्राचार्य बाबुराव काळे , माजी सैनिक डिगांबर खरात , माजी उपसरपंच अशोक खरात , समाधान राजगुरू , मनोज भोसले , संजय नवले , अक्षय मंडळकर , रामा मंडळकर यासह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला . 

पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी , संतोष राजपूत , गोपाल राजपूत , युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर , राजू गप्पे , दिपक गवळी , निलेश इंगळे यांनी केले होते . तर संचालन निलेश पोंधे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button