केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या आदेशाने महानगर पालिकेच्या तयारी साठी वॉर्ड निहाय पक्ष बांधणी

मुंबई / मधु गवई दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरू पौर्णिमाचे औचित्य साधून मा रामदास आठवले साहेब यांच्या आदेशानुसार विविध पदनियुक्ती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चारकोप विधानसभा मधील वार्ड क्र ३१ च्या वार्ड अध्यक्ष पदी मा सुरेंद्र मनोहर आणि वार्ड क्र २० चे अध्यक्ष संजय रमेश पवार मा प्रकाश चव्हाण यांची सरचिटणीस पदी, तर वार्ड क्र ३२ चे अध्यक्ष मा आकाश शर्मा यांची अधिकृतपणे नियुक्ती उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयात मा जिल्हा अध्यक्ष रमेश गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी मा रमेश गायकवाड साहेब अध्यक्ष उत्तर मुंबई जिल्हा, मा दिलीप वाव्हळ व मा मधुकर गवई अध्यक्ष चारकोप विधानसभा यांच्या हस्ते पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र देवून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या त्यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन करुन गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विश्व वंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन सामुहिक त्रिशरण पंचशील बुद्ध वंदना घेऊन आपले राजकिय गुरु मा रामदास आठवले साहेब यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली उपस्थित मान्यवर मा तुळशीराम कांबळे (मुंबई प्रदेश उपाध्यक्ष )
दिलीप व्हावळे (दहिसर तालुका अध्यक्ष)
रमेश डाके (जिल्हा उपाध्यक्ष)
गणेश खवरे जिल्हा उपाध्यक्ष
आनंद मु. कांबळे (मा.तालुका. अध्यक्ष)
मा सुहास मगरे उपाध्यक्ष चारकोप विधानसभा
राष्ट्रपाल सिरसाट (अध्यक्ष वार्ड क्रं ३)
रावसाहेब दाहीजे अध्यक्ष वार्ड क्र १९
विनोद बगाडे (तालुका अध्यक्ष)
अनिल अहिरे (जेष्ठ कार्यकर्ता)
राहुल लांडगे (जिल्हा कोषाध्यक्ष)
प्रविण भालेराव (तालुका उपाध्यक्ष)
मिलिंद अहिरे (तालुका सचिव)
उद्धव काकडे उपाध्यक्ष, हरिशंकर मिश्रा उपाध्यक्ष, धिरज भंडारी, चारकोप गांव, गौतम मगर, इत्यादी जेष्ठ कार्यकर्ते व वार्ड कार्यकर्ते, शाखा कार्यकर्ते,व आदि मान्यवर उपस्थित होते .
अशा सुंदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी मा रमेश गायकवाड साहेब यांचे आभार व्यक्त केले