सामाजिक

रोहिणी प्रकाशन मुंबई प्रकाशित, ‘नामस्मरण साधना’ ग्रंथाचा भिगवण येथे प्रकाशन सोहळा संपन्न.

भिगवन/ (बबनराव वि.आराख)श्री स्वामी समर्थ दरबार भिगवण येथे गुरुपोर्णिमा म्हणजेच, व्यास पौर्णिमा (दिनांक १० )श्री गुरु पूजन व श्री चंद्रहास रघुनाथराव धुमाळ लिखित ग्रंथ “नामस्मरण साधना” प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्यासाठी श्री स्वामी समर्थ महाराज सेवेकरी व भक्त जन मोठ्या संख्येने उपस्थित होते या दिवशी सदगुरू श्री स्वामी समर्थ व सदगुरू श्री गजानन महाराज यांचा अभिषेक, होम – हवन करून विधियुक्त पूजन झाले तद्नंतर भजन,आरती व श्री गुरूंचा सन्मान सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.त्यामध्ये भक्तांचा श्री गुरूंवरिल श्रद्धा आणि विश्वास दिसून येत होता. नामस्मरण साधना या ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सन्माननीय उपस्थिती मध्ये दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिवा, सौ. मायाताई झोळ, रोहिणी प्रकाशन (मुंबई) च्या सी.ई.ओ रोहिणी वाघमारे, हजरत पीर नजीर बाबा मुलानी (बारामती), माजी सैनिक संघटना (इंदापूर तालुका) चे अध्यक्ष श्री गवळी साहेब यांच्या उपस्थितीत झाला. या दिमाखदार कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ.श्री.आदित्य काका पुरकर(पी.एच.डी वास्तुशास्र व ज्योतिषशास्त्र), डॉ संकेत मोरे (अध्यक्ष मेडिकोज असो.भिगवण,व अध्यक मराठा महासंघ भिगवण) . सूत्र संचालन सौ.संगीता खाडे – दराडे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button