शांतीचा संदेश देणारे इस्लामचे धर्मगुरू मोहम्मद पैंगबर यांचा जन्मदिन रिपाइं आठवलें गटाच्या वतीने मिठाई वाटप करून केला साजरा

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- मातृतिर्थ बुलढाणा येथे मुस्लिम धर्मियाचे धर्मगुरू हजरत मोहम्मद अलैहे आलिहि व सल्लम पैगंबर जगात आले व त्यांनी जगाला मानवतेचा,शांतीचा, समाजात अन्याय, विषमता आणि अज्ञान पसरले होते त्यांनी सत्य,करूणा,बंधुता आणि अल्लाह वरील अतूट विश्वासाचा संदेश दिला. मानवतेचे कल्याण आणि सामाजिक सुधारणा हे त्यांच्या जीवनाचे मुख्य उद्दिष्ट होते. मानवाच्या समानतेसाठी त्यांचे संपूर्ण जिवन गेले. इस्लाम धर्माचे शेवटचे पैंगबर म्हणून मोहम्मद पैंगबर यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबरला बुलढाणा शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली होती त्या मिरवणुकीत उपस्थितील उपस्थितांना बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाच्या वतीने बुलडाणा येथील क्रांतीनगर क्रांती चौकात एक क्विंटलचे मोतीचूर्णाचे लाढू वाटून इस्लामचे धर्मगुरू पैगंबर यांचा जन्म दिवस बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख रिपाई आठवले बाबासाहेब जाधव, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नबाब मिर्झा बेग, रिपाइं एम्पलाईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष इंजिनियर विजय मोरे, रिपाई जिल्हा सरचिटणीस विजय देविदास साबळे,बुलढाणा, मोताळा अध्यक्ष केशवराव सरकटे,बाळासाहेब आहिरे यांचे उपस्थित मीठाई वाटप करून जन्मोत्सव साजरा केला. यावेळी रिपाई आठवलेंचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.