आजचा बालक उद्याचा सुज्ञ नागरिक घडवायचा असेल तर बालवयात धम्म संस्कार देणे आवश्यक- भंते यश श्रीलंका

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- चला जाऊ विहारात स्वत: मध्ये व आपल्या संपूर्ण कुटूंबामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आठवड्यातून एकदा दर रविवारी प्रत्येकाने बुध्द विहारात जायालाच पाहिजे चला सुसंस्कृत समाजाची उभारणी करू, बुध्द विहारात जाऊन ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी प्रत्येकाने बुध्द विहारात जाऊन सुसंस्कृत व्हावे असे मौलीक विचार भंते यश श्रीलंका यांनी मांडले. भंते यश यांनी बुध्द धम्मातील सुसंस्कृत गाथा सांगून मुलांनकडून वधून घेतल्या शिक्षणा मुळे सुसंस्कृत बनते, जिवनात परिवर्तन कसे होते यासाठी कसे आचार विचार असले पाहिजे म्हणून आयोजित केलेल्या दर रविवारी बुलडाण्यातील मैत्री विहारात दर रविवारी धम्म संडे स्कूल चालू केली धम्म संडे स्कूलचा दुसरा रविवारी, अपेक्षा पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
31.08.2025 पासून सुरू झालेल्या धम्म संडे सुरू झालेली आहे. भंतेजींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध तथा विश्ववंदनीय भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला दीप धूप पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष बबनराव चव्हाण समितीचे संचालक यांच्यामार्फत भंतेजींचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले.
भंतेजीचे आसन आसनस्थ होताच सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता आली प्रवचनामार्फत लहान लहान कथांचा संदर्भ देत विद्यार्थ्यांना धम्म उपदेश देण्यात आला. यश भंते श्रीलंका यांचे प्रवचन, लहान लहान कथेमार्फत विद्यार्थ्यांच्या बालमनावर धम्म ज्ञानाचे संस्कार घडत आहेत. याचे अनुकरण सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये दिसून आलेले आहेत. नित्य नियमाने दिलेला होमवर्क विद्यार्थ्यांनी काटेकोरपणे पूर्ण केलेला आहे असे दिसून आले. भंतेजीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर अचूक मिळाल्यामुळे भंतेजी सुद्धा अतिशय आनंद व्यक्त केला आहे, आधुनिक काळातील विद्यार्थी अतिशय हुशार असून थोड्याच काळामध्ये यांच्यामध्ये खूप काही बदल घडवणार असे आश्वासन दिले. पालक सुद्धा आपल्या पाल्यावर फार आनंदी असून भंतेजीने दिलेला उपदेशाप्रमाणे वागत आहेत, त्यामुळे पालक सुद्धा धम्म संडे स्कूलमध्ये आवर्जून हजेरी लावत आहे. एरवी टीव्ही व मोबाईल पासून विद्यार्थी दूर होत असताना पालक मनावर फार सकारात्मकतेचा भावना रुजत आहे.
आजच्या धम्म संडे क्लास साठी दानसूर भैयासाहेब पाटील व त्यांच्या सपत्नी त्यांचा संपूर्ण परिवार विद्यार्थ्यांना तसेच संपूर्ण विहारातील पालकांना अल्पोपरासाठी धम्मदान स्वरूपात विनम्रतेने अर्पण केले.
तसेच आर्मी मेजर कैलास खिल्लारे यांनी विद्यार्थ्यांना एक वही व एक पेन देऊन अतिशय मौल्यवान असे धम्मदान अर्पण केले.
यावेळी पी.आर.इंगळे, प्रेम इंगळे, मिलिंद तायडे,मिलिंद झीने,बाबुराव इंगळे.पत्रकार बाबासाहेब जाधव यांची विशेष उपस्थिती मिळाली,दीपक मनवर, प्रमोद कंकाळ,धम्मपाल अवसरमोल,शेगावकर सर, सुनील जाधव, पोळके इतर मान्यवर विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शरद नगराळे यांनी केले कार्यक्रमाची यशस्वीरित्या सांगता करण्यात आली व पुढील रविवारी या ही पेक्षा जास्त विद्यार्थी व पालक येतील याचे नियोजन समितीतर्फे करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.
सरणय गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली.