बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शरद खरात जिल्हाध्यक्ष पदीवरून निलंबित- रिपाइं प्रदेशाकार्ध्यक्ष बाबूरावजी कदम

बुलडाणा, (प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष शरद खरात यांची बुलडाणा जिल्हाध्यक्ष पदावरून निलंबित करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदेश कार्यध्यक्ष बाबूरावजी कदम यांनी त्यांना 8 सप्टेंबर 2025 च्या आदेशाव्दारे निलंबीत करण्यात आले.
त्यांच्या आजपर्यंतच्या कार्यांची चौकशी केली असता सर्व कामे ही पक्षाच्या हिताचे नसल्यामुळे वरिष्ठांना खोटे बोलणे,आजपर्यंत कार्यकारणी तयार न करणे, जून्या नव्या कार्यकर्त्यांना तसेच तालुका अध्यक्ष यांना जिल्हा कार्यकारणीला विश्वासात न घेता अकेलाचल मीच सर्व काही ही वागणूक असल्यामुळे पक्षाची पिछेहाट होत असून बदनामी होत आहे या त्यांच्या सर्व वागणुकीचा सर्व विचार करता हे जे त्यांचे वागण्याची पध्दत पाहता तसेच सर्व तालुक्याच्या तालुकाध्यांच्या जिल्हा पदाधिकारी यांच्या त्यांच्या तक्रारीची दखल घेऊन हे वागणे पक्षाच्या हिताचे नसल्यामुळे त्यांना पक्षातून निलंबीत करण्यात येत आहे.
यापूढे त्यांचा बुलडाणा जिल्हा रिपाई आठवले गटासी काहीही संबंध राहीला नाही याची जिल्हातील सर्व शासन प्रशासनांनी व रिपाइं च्या सर्व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी असे आदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे प्रदेश कार्यध्यक्ष बाबूराव कदम यांनी एका आदेशाव्दारे कळविले आहे.