आंबेडकरी चळवळीच्या पूर्णींगीनी डॅा. कमलताई रामकृष्ण उर्फ दादासाहेब गवईंचा युवा स्वाभिमानी पार्टी कडून अभिष्टचिंतन

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- ज्या आंबेडकरी चळवळीत ज्यांचे संपूर्ण आयुष्य गेले डॅा. बाबासाहेब आंबेडकरा नंतर रिपाईचे व आंबेडकरी चळवळीची धुरा ज्यांनी आयुष्यभर मरेपर्यंत सांभाळली, नागपूर बौध्द दिशाभूमिचे शिल्पकार असे दिवंगत महामहीम राज्यपाल, विधानपरिषदेचे सभापती दिवंगत दादासाहेब उर्फ रासू गवई यांच्या जीवन साथी पुर्णींगीनी म्हणून त्यांनी समर्थपणे साथ दिली, आदर्श माता म्हणून कुटुंबही वैभवशाली उच्चविद्याविभूषित केले असे मातोश्रीच्या पोटी हिरे जन्मले भारताचे मुख्य सरन्यायाधीश भुषण गवई व रिपाईचे नेते डॅा. राजेंद्र गवई यांच्या मातोश्री डॅा. कमलताई रामकृष्ण उर्फ दादासाहेब (रासू) गवई यांचा अभिष्टचिंतन सोहळा त्यांचे राहते घरी ” कृष्णकमल ” अमरावती येथे जाऊन युवा स्वाभिमानी पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मातृतीर्थ बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण सवणा तालुखा चिखली चे भूमिपुत्र शैलेंद्र तुकाराम कस्तुरे यांनी पुष्पगुच्छ शाल देऊन सत्कार केला व मातोश्रीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले त्यावेळी कस्तुरे यांचे मन भारावून आले मातोश्रीच्या वाढदिवसानिमित्त म्हणाले गवई परिवाराचा मान मोठा तसं त्यांचं मन ही मोठं आहे, आणि त्यांनी मनाचा मोठेपणा जिथं जिथं सिध्द केला आहे. म्हणून ” मोठ्याचं मोठेपण काय म्हणून सांगावे ।
या घराण्याने दिलं सर्व काही आता काय मागावे ।
मागणे फक्त एकच या शुभ दिनी, शंभर वर्षे आयुष्य मातेश्रीना लाभावे…। ” हीच त्या दयाळू महाकारूणीक भगवान गौतम बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो व युवा स्वाभिमानचे सर्वासर्वे आ.रवि राणा व संपूर्ण युवा स्वाभिमानी पार्टी कडून कोटी कोटी शुभेच्छा देतो.
या अभिष्टचिंतन सोहळ्या प्रसंगी माजी नगरसेवक तथा महानगरपालिका अमरावतीचे शिक्षण सभापती आशिष गावंडे, युवा स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष मक्सूद भाई, अश्विन उके, नितीन तायडे, गौतम हिरे, लत्ता अंबुलकर, शोभा किटके, सुनिता राऊत ईत्यादींनी मातोश्रीचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करून आशिर्वाद घेतले