सिंदखेड राजा तालुक्यात 80 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर

सिंदखेड राजा / प्रतिनिधी
आज दिनांक 8 जुलै 2025 रोजी सिंदखेड राजा तालुक्यातील 80 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होताच संपूर्ण तालुक्याचे लक्ष पंचायत समितीच्या जिजामाता सभागृहाकडे लागले होते. उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार अजित दिवटे यांनी गावकऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर केली.
आरक्षण प्रक्रियेमुळे गावागाड्यांत सत्तेच्या समीकरणात मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांचे स्वप्न चुरगळले गेले, तर काहींचे राजकीय भवितव्य उजळून निघाले.
सरपंच पदाची आरक्षणानुसार प्रमुख वर्गवारी खालीलप्रमाणे घोषित करण्यात आली:
अनुसूचित जाती महिला राखीव ग्रामपंचायती
आडगाव राजा, रताळी, गोरेगाव, वसत नगर, राजेगाव, नाईक नगर, उमनगाव, जळगाव, दत्तापूर
अनुसूचित जाती सर्वसाधारण
पिंपळगाव सोनारा, तांदुळवाडी, मोहाडी, वरुडी, लिंगा, वाघोरा, कोणाटी, धांदरवाडी, सोयदेव
ओबीसी महिला
वर्दडी बु., सिंदी, सावरगामाळ, बाळ समुद्र, नशिराबाद, पोफळ शिवनी, सोनोशी, पिपळगाव लेंडी, हिवरा गडलिंग, सावखेड तेजन, हनवत खेड (महारखेड)
सर्वसाधारण (ओबीसी)
कुंबेफळ, जांभोरा, शिवनी टाका, साठेगाव, पांगरी उगले, रूम्हना, संवडद, गारखेड, डावरगाव, देऊळगाव कोळ, वडाळी
सर्वसाधारण महिला
जऊळका, उमरद, धानोरा, वाघजाई, तढेगाव, हिवरखेड पूर्णा, वाघाळा, देवखेड, दुसर बीड, मलकापूर पांगरा, किनगाव राजा, साखरखेडा, कंडारी, ढोरवी, भंडारी, हनवत खेड (मलकापूर पांगरा), आंबेवाडी, खामगाव, भोसा, सुलजगाव
सर्वसाधारण (Open)
पिंपरखेड बु., शेंदुर्जन, राहेरी बु., चिंचोली, पिपळखुटा, जागदरी, सायाळा, विझोरा, केशव शिवनी, खैरव, बारर्लिंगा, चांगेफळ, धानोरा, आंचली, निमगावयाळ, ताडशिवनी, पिंपळगाव कुडा, दरेगाव, गुंज
तर महारखेड ग्रामपंचात अनुसूचित जमाती करिता सर्वसाधारण सरपंच पदासाठी राखीव सुटली आहे
राजकीय वर्तुळात खळबळ!
आरक्षणाच्या नव्या सोडतीमुळे अनेक इच्छुकांच्या गणितांवर पाणी फिरले असून, काही गावांत नवीन उमेदवारांच्या चर्चेला उधाण आले आहे. तथापि, बहुतांश ग्रामपंचायतींचे आरक्षण जुनेच राहिल्याने काहीसा स्थैर्यही निर्माण झाले आहे.
गावागावांत पुन्हा एकदा ‘कोण उभा राहणार?’, ‘सत्ता कुणाच्या हातात?’ या प्रश्नांनी राजकीय वातावरण तापू लागले आहे.
आरक्षणाचा निर्णय आता स्थानिक निवडणुकीच्या रणसंग्रामात निर्णायक ठरणार यात शंका नाही!
ग्रामपंचायत निवडणुकीचे रणशिंग वाजले असून, गावपातळीवर नवे राजकीय समीकरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे!
यावेळी निवडणूक विभागाचे खरात , व गणेश देशमुख, संजय आटोळे उपस्थित होते.