पहाडा सारखे उभे असलेले जिओ चे टॉवर बनले शोभेची वास्तू. हनवतखेड वाशियांचे नेटवर्क नसल्याने जगणे कठीण

सिंदखेड राजा (प्रतिनिधी) :- दैनंदिन जीवनात मोबाईल हँडसेट म्हणजे एक जीवनावश्यक वस्तू बनली आहे. एक वेळ जेवण वेळेवर नसेल तर चालेल पण नागरिकांना मोबाईल हँडसेट पाहिजे. आणि त्याला सुरळीत चालू ठेवण्यासाठी साठी नेटवर्क असणे गरजेचे असते. सिंदखेड राजा तालुक्यातील हनवतखेड गावकरी आता याच नेटवर्कमुळे त्रस्त झाले आहे. सविस्तर वृत्त असे की, हनवतखेड गावामध्ये जियो रिलायन्स कंपनीच्या वतीने जियो चा भला मोठा टॉवर उभा करण्यात आला आहे. अगदी “मला पाहा आणि पानफुल वाहा” अशा पद्धतीचा हा टॉवर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा टॉवर उभा असला तरी या टॉवरची नियमित घान आहे. पाऊसळ्यात तर दोन-दोन दिवस हा टॉवर बंद राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ होत आहे. फोन लावणे, मनोरंजनाचे साधने सर्वच नेटवर्क नसल्याने बंद पडत आहे. असे असेल तर मग हा जियो कंपनीचा टॉवर कशासाठी असा प्रश्न गावकरी उपस्थित करत आहे. मात्र तरी सुध्दा या कडे संबंधित कंपनी लक्ष द्यायला तयार नाही. यामुळे इथून पुढे कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना गाव बंदी करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे.
चौकट
अनेक वर्ष उलटून सुध्दा 5 जी कनेक्शन जोडण्यास कंपनीचे अपयश
गावकऱ्यांचे म्हणणे आहे की गावातील 90% लोक जियो कंपनीचा सिम कार्ड वापरतात मात्र अजून सुध्दा या टॉवरवर 5जी कनेक्शन जोडण्यात आले नाही. आम्ही नियमित 5 जी चा हाउचार टाकत असून याचा कवडीमोल सुध्दा फायदा आम्हाला होत नाही. यापेक्षा कंपनीने हा टॉवर काढून नेला तर आम्हाला वाईट वाटणार नाही. "तुम्ही मारल्यासारखे करा' आम्ही रडल्या सारखे करतो" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कंपनीने याकडे लक्ष न दिल्यास आम्ही टॉवर काढून नेण्यास भाग पाडू असे गावकरी म्हणत आहे.
चौकट
शेकडो तक्रारी करून सुध्दा सुधारणा नाही
जियो कंपनीचा टॉवर बसवल्या पासून या टॉवर ची सेवा बोगस दिल्या जाती. याच्या आम्ही शेकडो तक्रारी करून सुध्दा यावर कंपनीने काहीही उत्तर दिले नाही. ऑफलाईन, ऑनलाईन अशा प्रकारे अनेक वेळा आम्ही संपर्क केला आहे. मात्र कंपनीला काहीही घेणेदेणे नाही नेटवर्क नसताना आमचे जे नुसकान होते त्याची भरपाई आम्हाला जियो कंपनी देते का? 5जी रिचार्ज करुन सुद्धा दमडीचा ही लाभ आम्हाला घेता येत नाही. मग असे असेल तर बोगस कंपनीने टॉवर खोलून घेऊन जावा अन्यथा आम्ही त्यांची हकल पट्टी गावातून करणार असल्याचे विश्व फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष ऋषिकेश जायभाये यांनी म्हणले आहे.