माजी मंत्री महादेव जानकर यांनी केली शिंदी येथील पीक पाहणी ! राज्य सरकारने फक्त आश्वासन न देता शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी – माजी मंत्री जानकर

बुलढाणा /सचिन खंडारे १५ ऑगस्ट रोजी अतिवृष्टीने शिंदी येथील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, अनेक घरांची पडझड सुद्धा झाली होती, अनेकांच्या घरात पाणी बसून अन्य धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते,
त्यानंतर तहसीलदार अजित दिवटे, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, यांनी शिंदी येथे जावून नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली, शेतकऱ्यांना धीर दिला,
त्यानंतर दिनांक २३ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी शिंदी येथे जाऊन नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली, व तातडीने शेतकऱ्यांना मदत कशी मिळेल याची काळजी घ्या असे सुद्धा त्यांनी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जिल्हाधिकारी यांना फोनवरून सांगितले, तसेच राज्य सरकारने फक्त मोठमोठ्या गप्पा केल्या आम्ही कर्जमाफी करू असं करू तसं करू , तसे त्यांनी कुठलेही आश्वासन पाळले नसून, शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून तातडीने शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी सुद्धा माजी मंत्री महादेव जानकर यांनी राज्य शासनाकडे केली आहे, काही ठिकाणी अजूनही पंचनामे झाले नसून त्या ठिकाणचे पंचनामे सुद्धा त्वरित करण्याची मागणी त्यांनी केले, यावेळी माजी मंत्री महादेव जानकर यांच्या समवेत
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर तौसिफ शेख, प्रदेश सचिव संजय कन्नावार, प्रदेश सचिव नरेश मंडल, जिल्हाध्यक्ष कारभारी गायकवाड जिल्हा संपर्कप्रमुख अतुल भुसारी, तालुका अध्यक्ष संतोष वनवे, पत्रकार सचिन खंडारे, पंढरी आटोळे, परमेश्वर आटोळे, संतोष खरात, मंगेश बंगाळे नितेश खरात, रमेश खरात, किरण तांबोळी, पंजाबराव मोरे, सुनील खंडारे राहुल खंडारे, रतन खंडारे, साखरखेर्डा ग्रामपंचायत सदस्य देवानंद खंडागळे, हर्षल बंगाळे, यांच्यासह अनेक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .