एकनाथ वाघ यांची हॉवर्ड विद्यापीठात निवड – आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून भव्य सत्कार बुलढाणा जिल्हा गौरवान्वित करणारी अभिमानाची घटना!

लोणार चिखला / भागवत आटोळे येथील एकनाथ भगवान वाघ यांची उच्च शिक्षणासाठी थेट अमेरिकेतील प्रतिष्ठित हॉवर्ड विद्यापीठात निवड झाली आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल मेहकर-लोणार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी एकनाथ वाघ यांचा त्यांच्या आई-वडिलांसह शाल व पुष्पगुच्छ देऊन हृदयपूर्वक सत्कार केला.
अमेरिकेच्या वॉशिंग्टन शहरात वसलेले हे नामांकित हॉवर्ड विद्यापीठ “R2: डॉक्टरल युनिव्हर्सिटीज – उच्च संशोधन क्रियाकलाप” या श्रेणीत मोडते तसेच मध्य राज्य आयोगाद्वारे मान्यताप्राप्त आहे. त्यामुळे एकनाथ वाघ यांची या विद्यापीठात निवड ही केवळ चिखला गावासाठीच नव्हे, तर मातृतीर्थ सिंदखेडराजा व संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
याचबरोबर चिखला ग्रामपंचायतीत गावकऱ्यांनी घडवलेल्या विविध यशांची मालिका देखील विशेष उल्लेखनीय ठरली –
गणेश सुरेश काकड यांची सेल्स टॅक्स ऑफिसर पदावर निवड,
विकास मानवतकर यांची (SRPF) निवड,
गुलाबराव मानवतकर यांची बिनविरोध उपसरपंच पदावर निवड,
शंकरराव काकड यांची तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड,
विनोद नागरे यांची शाळा समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड.
या सर्वांचा आमदार सिद्धार्थ खरात साहेबांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या भव्य सत्कार सोहळ्याला उपस्थित मान्यवर :युवा नेते सतीश कायंदे,
लोकजागर परिवाराचे विश्वस्त प्रवीणभाऊ गीते,
उत्कर्ष फाऊंडेशनचे अध्यक्ष विठ्ठल चव्हाण,
अठेश्वर महाराज संस्थानचे पुजारी मा. शिवराम पुरी,
साहित्यिक रविंद्र साळवे (बुलढाणा),
दैनिक पुण्यनगरीचे तालुका प्रमुख भगवान साळवे,
अमोल पैठणे, भास्करभाऊ चौधरी, प्रविण पवार, संजीवनी वाघ,
सुभाष पाटील, विकास जायभाये, देवानंद नागरे, मंगेश धांडे,
दिनकर चव्हाण, सर्जेराव नागरे, सुनिल ढाकणे, महेबुब भाई,तसेच चिखला येथील असंख्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकनाथ वाघ यांचा हॉवर्ड विद्यापीठात प्रवेश हा चिखल्याच्या पराक्रमाचा सुवर्ण अध्याय ठरला असून, बुलढाणा जिल्ह्याच्या शैक्षणिक इतिहासात नवे पर्व लिहिले गेले आहे.