विद्यार्थी घडवताना समाजाशी जोडलेली नाळ – सोनुने सरांचा आदर्श प्रवास” ३५ वर्षांची प्रामाणिक सेवा, विद्यार्थ्यांचे घडविलेले उज्वल भविष्य, समाजाशी नाळ जोडणारे प्रेरणास्थान.

सिंदखेडराजा/रामदास कहाळे– “शिक्षक हा केवळ ज्ञानदाते नसून तो समाजाचा मार्गदर्शक, संस्कारकर्ताही असतो”, हे विधान सत्य करून दाखवणारे नाव म्हणजेच आदर्श शिक्षक एकनाथ सोनुने सर.
२७ ऑगस्ट १९६३ रोजी ऐतिहासिक आडगावराजा नगरीत जन्मलेल्या सरांचे बालपण फुले–शाहू–आंबेडकरी चळवळीच्या वातावरणात गेले. घरातील प्रेरणेने शिक्षणाची वाट धरून त्यांनी चिखली येथील शिवाजी अध्यापक विद्यालयातून डी.एड. पूर्ण केले आणि ११ नोव्हेंबर १९८६ रोजी पिंपरखेड बु. येथून शिक्षक सेवेची पावन सुरुवात केली.
📚 शिक्षणासोबत समाजकारण
पहिल्या दिवसापासूनच “विद्यार्थ्यांचे पहिले पाऊल भक्कम असावे” या ध्येयाने त्यांनी काम केले. शिक्षणाबरोबरच समाजकार्यही अंगीकारले. पिंपरखेड बु. शाळेत सेवा करत असताना सरांनी साने गुरुजी आदर्श शाळा पुरस्कार मिळवून दिला. त्यानंतर रुम्हणा येथे ६ वर्षे सेवेत असताना १० विद्यार्थी नवोदय विद्यालयात पाठवण्याचा विक्रम घडविला.
शिवणी टाका येथे रुजू झाल्यावर त्यांनी “हगणदरीमुक्त गाव” चळवळीत मोलाचा सहभाग घेतला. परिणामी, गावाला निर्मल ग्राम पुरस्कार तर शाळेला साने गुरुजी स्वच्छ शाळा पुरस्कार प्राप्त झाला.
🏆 पुरस्कारांनी गौरवलेली कारकीर्द
त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना सलग अनेक मान सन्मान लाभले.
२००७ – जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
२००९ – राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (महामहिम राज्यपाल यांच्या हस्ते)
२०१३ – महाराष्ट्र गुणीजन रत्नगौरव पुरस्कार (मुंबई)
२०१४ – प्राईड ऑफ नेशन अवार्ड (हैद्राबाद)
२०२० – महात्मा फुले प्रज्ञावंत गुरु सन्मान (जळगाव)
शिक्षक म्हणून प्रामाणिक सेवा व समाजाशी एकनिष्ठ नाळ जोडल्यामुळे सरांना तालुक्यातील एकमेव तीन वेतनवाढी मिळाल्या, ही त्यांची मोठी कामगिरी ठरली.
👨👩👦 आदर्श कुटुंबवत्सल शिक्षक
गरिबीतून संघर्ष करत आलेले सोनुने कुटुंब आज शिक्षण आणि सामाजिक कार्याचे उत्तम उदाहरण आहे.
मोठा मुलगा सुनिल सोनुने ग्रामसेवक,
सून सोनाली सुनील सोनुने ग्रामसेविका
लहान मुलगा डॉ. प्रविण (MBBS, MS Ortho )
डॉ.निकिता प्रविण सोनुने (MBBS DNB Medicine)
पुतण्या डॉ. स्वप्नील ज्ञानेश्वर सोनुने (BAMS)
डॉ. सुनिता स्वप्निल सोनुने
(BHMS Gyanac)
“मुलांसाठी पैसे साठवले नाहीत, पण पैसे कमावणारी सुशिक्षित मुले घडवली” हे वाक्य सरांच्या जीवनकार्याचे सार सांगून जाते.
एक आदर्श प्रेरणास्थान
१९८६ पासून अखेर ३५ वर्षांची सेवा करताना त्यांनी प्रत्येक शाळेला नवी ओळख दिली. देऊळगावराजा तालुक्यातील पांगरी येथील शाळेला त्यांनी ISO मानांकन शाळा बनविण्यातही मोलाचा वाटा उचलला.
त्यांचे अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत समाजसेवा करत आहेत.
वाढदिवसानिमित्त शुभेच्छा
२७ ऑगस्ट हा सरांचा वाढदिवस…त्यांनी शिक्षणक्षेत्रातील नि:स्वार्थी कार्यकर्तृत्व, सामाजिक संवेदनशीलता व चळवळीशी नाळ जोडलेली वृत्ती यामुळे सोनुने सर समाजासमोर “आदर्श शिक्षक” म्हणून उभे आहेत.
ज्ञान की मशाल जलाकर अंधेरों को मिटाया,
समाज और शिक्षा का संगम हर कदम पर दिखाया।
गुरु बनकर जो दिलों में उजाला कर गए,
वो हैं एकनाथ सोनुने सर — नाम रोशन कर गए।
शब्दांकन _ रामदास कहाळे संपादक पीपल्स न्यूज इंडिया
9881779820