ताज नाणी वस्तू संग्रहालय, अंत्री खेडेकरला युगपुरुषाची भेट…

बुलढाणा/ रामदास कहाळे देशभरात गाजलेल्या मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री युगपुरुष पुरुषोत्तम साहेब खेडेकर यांनी २० जुलै २०२५ ला ताज नाणी व वस्तू संग्रहालय अंत्री खेडेकर येथे भेट दिली.
ताज संग्रहालयाचे अध्वर्यू नाणेतज्ञ शेख दिलावर यांना मराठमार्ग, महाराणी ताराबाई आणि जिजाऊ यात्रा इत्यादी पुस्तकांची भेट देऊन जिव्हाळ्याचे सन्मान केले.
व तसेच नुकतेच कोल्हापूर येथे राजर्षी शाहू प्रेरणा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सदिच्छा ही दिल्या.
आपल्या धडावर आपलेच मस्तक असावे या दृष्टीतून समाजाला सत्यशोधकीय आणि शिवधर्माकडे आकर्षित करणारे, लेखक, युगपुरुष यांनी संग्रहालयातील नाण्यांचे बारकाईने निरीक्षण केले आणि नाणेतज्ञ शेख दिलावर यांच्याकडून विविध संस्था, स्थानिकांच्या, राजे, महाराजांच्या नाण्यांची सखोल माहिती जाणून घेतली.
पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या व शिवमती सौ. माजी आमदार रेखाताई खेडेकर यांच्या आगमनाने अंत्री नगरीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
माजी आमदार सौ. रेखाताई खेडेकर, मनोज खेडेकर, अय्युब शेख, राजू भाई शेख, युनुस भाई, राजवैभव मोरे, दिपेश मोरे, ओम खेडेकर, यश मोरे इत्यादींची उपस्थिती यावेळी लाभली होती.