Uncategorizedविशेष

वनरक्षक पोटे साहेबांची धडाकेबाज कारवाई तब्बल वीस वर्षानंतर आंचरवाडी बीट मध्ये कारवाइ

चिखली /सिद्धार्थ पैठणे वन विभागाच्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली असून अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे पोटे साहेबांनी दणाणून सोडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान मौजे अमोना येथील गट क्रमांक 134 बाजीराव सुदामा वानखेडे यांच्या शेताच्या दक्षिणेस अमोना देऊळगाव घुगे कोनड शिव येथे एक काळवीटाची शिकार!शिकाऱ्यांनी पकडले होते परंतु शिकारी आणि शेतकरी यांच्यात वाद झाल्याने त्यांच्या झटापट झाली आणि या झटापटीत शिकारींनी त्या शेतकऱ्याला हत्याराने मारण्याचा प्रयत्न केला परंतु तो मार फारसा खोलवर नसल्याने तेथे आरडा ओरड झाल्याने शेतकरी जमा झाले आणि त्या शिकार्‍यांचा तों डाव फसला परंतु ते एवढ्या लांबून येऊन शेतकऱ्यावर दादागिरी करतात तर वन विभागाचा वचक आजपर्यंत नव्हता असे म्हणायला कुठलीही हरकत नाही. परंतु अशातच पोलीस कर्मचारी वेळेवर पोचून सदर जखमीस दवाखान्यात नेण्यात आले तर वारिस्ट अधिकारी ए एन ठाकरे यांच्या आदेशानुसार त्या जागेवर असलेल्या दोन पल्सर तर एक स्प्लेंडर कंपनीची गाडी सह त्या काळवीट प्राण्याला दवाखान्यात नेऊन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे काम श्री गजानन पोटे यांनी करत वन्यजीव सवरक्षण अधिनियम 1972चे कलम 9.44.39.48अ.50(1)(c).51(1)नुसार अज्ञात विरोधात कारवाई केली या कारवाईसाठी त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे वन विभागाच्या वेळोवेळी वन्य प्राण्याचा हैदोस किंवा वन्य प्राण्याची पाण्यासाठी भटकंती ही गेल्या कित्येक दिवसापासून अंचरवाडी बीटमध्ये होत होती परंतु आता पहिल्यांदाच एक दबंग व धडाकेबाज अधिकारी मिळाल्याने त्याच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक होऊन त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडत आहे यावेळी श्री गजानन पोटेसह नेवरे वनपाल बकाल वनपाल मुंढे वनरक्षक मडावी वनरक्षक ऋषीं तुपकर वनसेवक सह इतर कर्मचारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button