मातृतीर्थ सिंदखेडराजा रिपाई आठवलेंच्या तालुकाध्यक्षपदी भानुदास शेजूळ

मातृतीर्थ सिंदखेडराजा रिपाई आठवलेंच्या तालुखाध्यक्षपदी भानुदास शेजूळ
बुलडाणा,(प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची जिल्हा बैठक देऊळगाव राजा रेस्ट हाऊस मध्ये ३० जूलै रोजी रिपाइं जिल्हाध्यक्ष शरद खरात यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजीत केली होती. सर्वप्रथम महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून करून बैठकीस सुरूवात केली. या जिल्हा बैठकीत रिपाई राष्ट्रीयध्यक्ष ना. रामदासजी आठवले सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार हे ७ सप्टेंबर २०२५ रोजी बुलडाणा जिल्हा दैऱ्यावर येत आहे त्या दौऱ्याच्या नियोजन विचार विनिमय करण्यात आला. होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रिपाइं आठवले पक्षाची काय भूमिका आहे स्वतंत्र लढावयाचे की आपला मित्र पक्ष भाजप महायुती बरोबर लढावयाचे यावर विचार विनिमय करण्यात आला. या जिल्हा बैठकीत चांगेफळ निवासी भानुदास अभिमान शेजूळ यांची मातृतीर्थ सिंदखेडराजा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या तालुकाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली. भानुदास शेजूळ यांचे सामाजिक क्षेत्रात फार मोठे काम आहे ते जिप चांगेफळ शाळेचे ५ वर्षे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, नालंदा बुद्ध विहार ट्रस्टचे अध्यक्ष आहे त्यांचे सिंदखेडराजा तालुक्यातील सामाजिक धार्मिक काम फार मोठे आहे त्यांच्या या कार्याचा उपयोग रिपाइं आठवले पक्ष वाढविण्यासाठी होईल याचा सर्वसार विचारकरून त्यांना रिपाई आठवले गटाच्या सिंदखेडराजा तालुकाध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष शरद खरात व बाबासाहेब जाधव यांनी नियुक्ती पत्र देऊन त्यांचा सत्कार केला व सर्व उपस्थितांनी त्यांचे स्वागत केले. त्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बुलडाणा तालुकाध्यक्ष केशवराव सरकटे, मोताळा तालुकाध्यक्ष बाळासाहेब आहीरे, जिल्हा सचिव विजय देविदास साबळे, जिल्हा उपाध्यक्ष पंकज वाघ, सुनिल कांबळे, महेंद्र इंगळे, अमर कासारे, प्रमोद जाधव, प्रविण जाधव, संतोष जाधव, सुरज शेजूळ, वैभव गायकवाड, सचिन जाधव, हर्बल शेजूळ, कुणाल शेजूळ इत्यादी जिल्हा भरातील बहुसंख्येने पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.