मुख्याध्यापकाचा बनावट कागदपत्रांचा घोटाळा उघड… पण शिक्षण विभाग झोपेत!

सिंदखेडराजा (रामदास कहाळे):
शिक्षण विभागातील गलथान कारभाराचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे!
दुसरबीड येथील सत्यजित अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये खोटे कागदपत्र सादर करून तब्बल ५ लाख रुपयांचे कर्ज उचलणाऱ्या जि.प. शाळेतील उच्च श्रेणी मुख्याध्यापक दामोदर माणिकराव बुरकुल याने शिक्षण क्षेत्राची नाचक्की केली आहे.
या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला, आरोपीस अटक झाली, पोलिस तपासात बनावट हमीपत्र, बनावट सह्या आणि शिक्क्यांचा वापर सिद्ध झाला, तरीसुद्धा शिक्षण विभाग पूर्णतः गप्प… कारवाई शून्य!
सन 2020 मध्ये कर्ज घेतलं,
2023 मध्ये गुन्हा दाखल,
4 ऑगस्ट 2025 रोजी अटक,
6 ऑगस्ट रोजी जामीन मंजूर,
पण… 2025 मध्येही शिक्षण विभाग जागा झाला नाही!
विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असलेल्या मुख्याध्यापक पदावर बसून बुरकुल यांनी बनावट कागदपत्र सादर करत केलेली ही फसवणूक केवळ पतसंस्थेची नव्हे, तर शिक्षण व्यवस्थेचीच फसवणूक आहे!
🕵️♀️ याशिवाय, देऊळगाव राजा पोलिस ठाण्यातही याच आरोपीवर फसवणुकीचा आणखी एक गुन्हा नोंद आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळते.
शिक्षण विभागाचे जबाबदार अधिकारी गप्प का…?
यासारख्या गंभीर प्रकारावर शिस्तभंग, निलंबन, चौकशी वा कारवाईचे आदेश देण्याऐवजी –
विभागात खाजगीत कुजबुज, दबक्या आवाजात चर्चा, आणि संशयास्पद शांतता आहे!
▪️ कोण अधिकारी पाठीशी घालतंय?
▪️ शिस्तमंडळ अजूनही झोपेत आहे का?
▪️ मुख्याध्यापक पदाची नैतिक जबाबदारी यांना मान्यच नाही का?
इतक्या मोठ्या गुन्ह्यावरदेखील शिक्षण विभागाचे मौन म्हणजे संवेदनशून्यता की संगनमत? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जनतेचा सवाल – गुन्हेगाराला पाठीशी घालणं थांबवा!
शिक्षण क्षेत्र पवित्र ठेवा, भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिक्षितांचा बुरखा नको!
ही फक्त बातमी नाही, ही शैक्षणिक व्यवस्थेतील नासधूस आणि व्यवस्थेतील मूक सहमतीची गोष्ट आहे.