सामाजिक

संततधार पावसाचा तडाखा —सोनोशीच्या दोन शूरवीरांची पुरातून थरारक जीव वाचवण्याची मोहीम!

सिंदखेडराजा (रामदास कहाळे)
सिंदखेडराजा तालुक्यात आज सकाळपासून संततधार पाऊस कोसळत असून नदी-नाल्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाण्याचा प्रचंड वेग, खळखळणारे प्रवाह आणि धोक्याचा इशारा देणारा निसर्ग… अशा गंभीर वातावरणात सोनोशी गावात आज सकाळी एक थरारक घटना घडली.

गावाजवळील नदीला अचानक आलेल्या पूरात आपल्या कर्तव्यावर जाणारे एका मोटार सायकलस्वराचे मोटारसायकलवरील पुराच्या पावसाने संतुलन बिघडले. पाण्याच्या प्रचंड लाटांमध्ये ते वाहून जाण्याची वेळ आली होती. नेमक्या या क्षणी, घटनास्थळी उपस्थित असलेले गावातील दोन पराक्रमी युवक शेख जावेद आणि शेख आसेफ यांनी क्षणाचाही विलंब न करता जीवाची पर्वा न करता पुराच्या लाटांत उडी घेतली.

पाण्याच्या प्रखर प्रवाहाशी झुंज देत, त्यांनी घट्ट पकडून सुरक्षित किनाऱ्यावर आणले. त्यांच्या या धाडसी कर्तृत्वाने संपूर्ण परिसरात कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावकुसापासून ते सोशल मीडियापर्यंत या दोन तरुणांच्या पराक्रमाची चर्चा रंगली आहे.

आजच्या या घटनेने केवळ एका जीवाचा बचाव झाला नाही, तर संकटसमयी मानवी मदतीची खरी ओळख पुन्हा अधोरेखित झाली आहे.
“शेख जावेद व शेख आसेफ — सोनुशीचे खरे जलवीर!”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button