महाराष्ट्र

“अमरावतीत ‘उमेद’ प्रकल्प संचालकावर गंभीर आरोप – कंत्राटी अधिकाऱ्याच्या आत्महत्येला जबाबदार ठरवत संघटनेची थेट सदोष मनुष्यवधाची मागणी; तात्काळ निलंबन व हकालपट्टीचा अल्टिमेटम!”

सिंदखेड राजा/ रामदास कहाळे – उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी अधिकाऱ्याने आत्महत्या केल्यानंतर अमरावती जिल्हा मोहिला बचतगट व रोजगार हमी कामगार संघटनेने प्रकल्प संचालकावर गंभीर आरोपांचा भडीमार केला आहे. या प्रकरणात प्रकल्प संचालकाच्या त्रासामुळेच आत्महत्या झाल्याचा दावा करत संघटनेने हा प्रकार थेट सदोष मनुष्यवध ठरवावा, अशी मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे केली आहे.

 

संघटनेच्या निवेदनानुसार, दिवंगत कंत्राटी अधिकाऱ्यावर प्रकल्प संचालकाने वारंवार मानसिक छळ, धमक्या व कामातून बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या. यामुळे त्या अधिकाऱ्याने टोकाचा निर्णय घेतला. हा प्रकार केवळ वैयक्तिक नसून, संपूर्ण उमेद प्रकल्पाच्या कामकाजातील गैरव्यवहार, मनमानी आणि दडपशाहीचे प्रतिबिंब असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.

 

संघटनेचे पदाधिकारी म्हणाले की, “सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तात्काळ प्रकल्प संचालकाला निलंबित व सेवेतून हाकलावे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमचा तीव्र आंदोलनाचा इशारा आहे.” निवेदनामध्ये पीडित अधिकाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाने घ्यावी आणि प्रकल्पाच्या सर्व पदांवरील गैरप्रकारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

 

या घटनेनंतर उमेद प्रकल्पातील कामकाजाविषयी गंभीर प्रश्न निर्माण झाले असून, जिल्हा प्रशासनावर तातडीने निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितता, सन्मान व मानसिक आरोग्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटना अध्यक्ष सौ. निर्मला शेलार (पाटील) सौ.मालुताई देशमुख तथा राज्य कर्मचारी कार्यकारणी 

सदर निवेदन आज दिनांक 11 जुलै रोजी तहसीलदार व गटविकास अधिकारी पंचायत समिती सिंदखेड राजा यांना उमेद महाराष्ट्र राज्य महिला कर्मचारी संघटना सिंदखेड राजा तालुक्याच्या वतीने देण्यात आले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button