विशेषमहाराष्ट्र

इतिहासाला कलाटणी देणारे महान युगपुरुष राजे लखुजीराव जाधव एक दृष्टी क्षेप इतिहास अभ्यासक छगन झोरे

मातृतीर्थ सिंदखेडराजा/ छगन झोरे इतिहास अभ्यासक    इतिहासाला कलाटणी देणारे महान युगपुरुष राजे लखुजीराव जाधव एक दृष्टी क्षेप   महाराष्ट्रातील शूरवीर घराण्यापैकी मातंबर घराणे म्हणजे मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राजे लखुजीराव जाधव यांचे घराणे सिंदखेड राजा या नगरीला जगाच्या पटलावर आणण्याचे काम फक्त राजे लखुजीराव जाधव यांच्यामुळेच झाले या शहरांची ओळख जाधवांची नगरी म्हणून झाली अख्या महाराष्ट्रात जाधवांचे सिंदखेडराजा अशी ख्याती झाली राजे लखुजीराव जाधव यांनी राज्यकारभार पाहण्यासाठी उपराजधानीचा दर्जा असलेले भव्य दिव्य राजवाडा बांधला याच राजवाड्यात जिजाऊ चा जन्म झाला हा राजवाडा बांधत असताना प्रचंड पैसा लागला वेळ प्रसंगी त्यांनी सावकार वाडा येथे राहत असलेल्या सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले राजवाडा बांधून झाल्यानंतर काही वर्षांनी ती पैसे परत दिले अशी इतिहासाच्या पुस्तकात नोंद आहे त्यांनी राज्यकारभारासाठी बांधलेला राजवाडा अत्यंत देखणा सुंदर व आकर्षक होता परंतु काळाच्या ओघामध्ये जवळपास 80 टक्के ही वास्तू नष्ट झाली फक्त 20% ही वास्तू शिल्लक आहे राजे लखुजीराव जाधव यांनी वर्षभरातील सण उत्सव व इतर महत्त्वाच्या बैठकीसाठी नियोजनासाठी एक सुंदर आकर्षक वास्तू बनली ती म्हणजे रंगमहाल याच रंगमहालामध्ये शहाजीराजे भोसले व राजमाता जिजाऊ यांची पहिली भेट रंगपंचमीनिमित्त याच वास्तूमध्ये झाली होती अशी इतिहासाच्या पुस्तकांमध्ये नोंद आहे जाधव घराण्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडीची साक्ष देत ही वास्तू आजही मोठ्या डोलाने उभी आहे राजे लखुजीराव जाधव यांनी राज्यकारभारासाठी व जनतेच्या सुख सुविधासाठी व जनतेच्या भल्यासाठी ज्या ज्या वास्तू आवश्यक आहे त्या सर्व वास्तू त्यांनी सिंदखेडराजा येथे उभारल्या यापैकी अनेक वास्तू बऱ्यापैकी आजही उभे आहेत तर अनेक वास्तू नष्ट झालेले आहेत

राजे लखुजीराव जाधव यांनी सिंदखेड राजा शहरामध्ये अनेक मंदिरे बांधली रेणुका माता मंदिर यासह अन्य मंदिरे बांधली तर अनेक मंदिराचा जीर्णोद्धार केला बांधकाम डागदुजी दुरुस्ती केली सिंदखेडराजा शहराचे ग्रामदैवत रामेश्वर मंदिर या मंदिराची त्यांनी दुरुस्ती केली निळकंठेश्वर मंदिर या मंदिराची सुद्धा त्यांनी दुरुस्ती केली अनेक मंदिराची त्यांनी दुरुस्ती केली तसेच

शेतकऱ्याला शेतीसाठी पाणी पाहिजे हा मोठा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा मिटावा म्हणून सिंदखेडराजा शहराच्या अलगत व परिसरात 22 तलावाची विहीर बारव निर्मिती केली काळाच्या ओघामध्ये जवळपास 99% तलाव नष्ट झाले आहेत आता फक्त त्याच्या पाऊल खुणा शिल्लक आहेत सिंदखेडराजा परिसरात त्यांनी नामवंत आंब्याच्या बागा लावल्या तसेच फळझाडे सुगंधित फुलाच्या बागा निर्माण केले निसर्ग संपन्न हा परिसर निर्माण केला राजे लखुजीराव जाधव हे सर्व गुण संपन्न राजे होते त्यांनी हे त्यांच्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिले

15 वे व 16 या शतकामध्ये जाधवांच्या काळामध्ये सिंदखेडराजा या शहराची लोकसंख्या46 हजार एवढी होती संपूर्ण सिंदखेडराजा शहराला भिंतीची तटबंदी होती येण्या जाण्यासाठी चारचौक्या व त्या चौकीवर शिपाई अत्यंत शिस्तबद्ध हे गाव त्यांनी त्यांच्या हुशारीने व नियोजनाने त्याची सुनियोजित उभारणी केली सिंदखेडराजा शहराच्या प्रतेक भागात त्यांनी मारुती मंदिर बांधली या शहरात 12 पेक्षा जास्त मारुती मंदिरे आहेत व प्रतेक जातीधर्मासाठी त्यांनी काम केले राजे लखुजीराव जाधव यांच्या जीवनामध्ये जातीधर्माला थारा नव्हता तर त्याच्या अंगीभुत गुणाला महत्त्व होते त्यामुळेच जाधवांच्या सैन्यामध्ये अष्टप्रधान मंडळामध्ये न्यायनिवाडा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी अठरापगड जातीच्या मावळ्यांना त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार न्याय दिला

राजे लखुजीराव जाधव हे स्त्री पुरुष समानता मानणारे राजे होते त्यांनी हा कोणताही भेद केला नाही कारण चार मुलांच्या जन्मानंतर राजमाता जिजाऊ चा जन्म झाला या पाचही अपत्यांना त्यांनी तलवारबाजी घोडेस्वारी
प्रत्येक क्षेत्रात सर्वांना सारखा न्याय दिला राजे लखुजीराव जाधव यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी राणी माळसाबाई यांनी सती न जाण्याचा निर्णय घेतला कारण राजे लखुजीराव जाधव यांनी संपूर्ण जीवन समाजातील अंधश्रद्धा व जुन्या चालीरीती नष्ट करून प्रगल्भ समाज निर्मितीसाठी काम केले त्यांचाच आदर्श घेऊन त्यांची पत्नी राणी माळसाबाई यांनी पतीचे निधन झाल्यानंतर राज्यकारभार सांभाळण्याचे काम केले

निजामशाही आदिलशाही मोगल शाही कुतुबशाही स्वकीय व परकीय शत्रूला प्रचंड धाक जाधव यांचा होता राजे लखुजीराव जाधव युद्ध धुरंदर महान पराक्रमी अत्यंत बुद्धिवान शक्तिशाली व प्रजाहितदक्ष राजे होते अख्या जीवनामध्ये एकही युद्ध न हरलेला हा राजा अनेकांच्या डोळ्यात खूपत होता जाधव रावांचा दरारा अनेकांना सहन होत नव्हता त्यामुळेच त्यांच्यासोबत राहणारे अनेक अदृश्य शत्रू त्यांचे निर्माण झाले जाधवांचा सिंदखेडराजा येथील सुंदर राज्यकारभार व प्रशासन पाहून अनेक शत्रूच्या पोटात धडकी भरत असे ज्याच्या सोबत ते काम करीत असे असे निजामशहा यांना सुद्धा हे वैभव सहन झाले नाही

निजाम शहा यांनी गोडी गुलाबी ने राजे लखुजीराव जाधव यांना निरोप पाठवला तुमचा मान सन्मान करायचा आहे आदरतिथ्य करून राजकीय चर्चा करायची आहे असा खोटा निरोप सिंदखेड राजाला पाठवला राजे राजे लखुजीराव जाधव यांनी मनात कोणतीही शंका कुशंका न आणता निजाम शहा यांच्यावर भरोसा ठेवून दौलताबाद इथे गेले पत्नी राणी माळसाबाई बंधू राजे जगदेवराव जाधव व सैनिक दौलताबाद किल्ल्याच्या पायथ्याशी ठेवले व सोबत राजे लखुजीराव जाधव यांनी
मोजकी काही निवडक सहकारी सोबत घेतले त्यामध्ये त्यांचे पुत्र रघुजी राजे जाधव अचलोजी राजे जाधव व नातू यशवंत मात्र या सर्वांना अगोदरच निशस्त्र करण्यात आले होते दौलताबाद किल्ल्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या दरबारामध्ये लखुजीराव जाधव व त्यांचे कुटुंब जाताच त्यांच्यावर हल्ला चढवण्यात आला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या घटनेने महाराष्ट्रातील एक मोठे मातब्बर घराणे नष्ट झाले

राजे लखुजीराव जाधव यांची पत्नी माळसाबाई व बंधू राजे जगदेवराव जाधव यांनी जाधवराव च्या मृत्यूनंतर सिंदखेड राजाचा राज्यकारभार सांभाळला जगातील सर्वात मोठी हिंदू राजाची समाधी राजे लखुजीराव यांची समाधी बांधण्यात आली अनेक वास्तु बांधल्या मात्र ही जाधव मंडळी विकास करीत असताना यांच्यावर निजाम शहा व इतरांचे बारीक लक्ष होते राजे जगदेवराव जाधव यांनी जगातील सर्वात सुंदर व आकर्षक भुईकोट किल्ला काळा कोट बांधकाम सुरू केले तो किल्ला सुद्धा निजामाने पूर्ण होऊ दिला नाही अर्धवट असतानाच बंद पडला व जाधव कुटुंबाचे सिंदखेडराजा ऐतिहासिक नगरीला फार मोठे बनवण्याची स्वप्न होते ती स्वप्न मात्र अधुरीच राहिले ते शत्रुने पूर्ण होऊ दिले नाही

राजे लखुजीराव जाधव सारखा महान शूरवीर कर्तबगार व सर्व गुण संपन्न राजा भारतीय इतिहासात दुर्मिळच जाधवराव यांच्या संस्कार मधूनच राजमाता जिजाऊ यांनी जगातील सर्वश्रेष्ठ कर्तबगारी त्यांनी करून दाखवली छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुद्धा राजे लखुजीराव जाधव यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा त्यांच्या जीवनावर पडसाद उमटलेला दिसून येतो कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजे लखुजीराव जाधव यांच्यासोबत झालेला प्रसंग आपल्या सोबत होऊ नये म्हणून राजमाता जिजाऊ यांनी त्यांना लहानपणापासूनच राजकीय धडे दिले त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रताप बद्दल विचार करायचा असेल तर सिंदखेडराजा व राजे लखुजीराव जाधव यांचा अभ्यास करावाच लागेल
जाधवरावांचा इतिहास हा मोजक्या शब्दात मांडण्यासारखा विषय नाही प्रचंड गहन व फार मोठा विषय आहे मात्र मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला
जिजाऊ जय शिवराय जय लखुजीराव जाधव

आपला
छगन झोरे सिंदखेड राजा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button