गोशाळेची अशीही आदर्श सेवा गाईंच्या पंचगव्य व गोमय पासून उत्पादनाच्या वाटचालीकडे

देऊळगाव राजा/राजू भालेराव आपल्याला माहिती आहे की आज गोहत्या वरून देशात अनेक ठिकाणी दंगली पेटतांना दिसत आहेत. सरकारला सुध्दा कायदे बनवावे लागले, अशातच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील किन्ही नाईक या छोट्याश्या गावात गोरक्षणासाठी गावातील काही गोरक्षक पुढे येतात तर त्यापैकी एक गोरक्षक विनोद कोकाटे आपली स्वतः ची सात एक्कर असलेल्या शेती पैकी चार एक्कर गोरक्षणासाठी दान देऊन एक जगदंबा माता गोरक्षण सिद्ध पिठ चॅरिटेबल ट्रस्ट, द्वारा संचालित, गायत्री गो सेवा धाम व गो विज्ञान केंद्र, किन्ही नाईक येथे,स्थापन करून परिसरातील दानदात्यांच्या व श्रमदात्यांच्या सहकाऱ्याने तब्बल गेल्या पाच वर्ष्यापासून अविरत गोपालनाचे कार्य सुरू आहे. आज जवळ जवळ 121 गायी चे पालन केल्या जात आहे.
आपल्याला माहितच आहे की मुक्या जनावरांचा सांभाळ करणे किती कठीण असते त्यात छोट्याशा गावात दानदात्यांच्या सहकाऱ्याने शक्य होत नाही तरीही विनोद कोकाटे व त्यांच्या खांद्याला खांदा लावून निस्वार्थ कार्य करणारे सहकारी न डगमगता स्वर्गीय राजीवजी दिक्षित यांच्या प्रेरणेतून गोरक्षणासाठी लागणारा खर्च व गाव अर्थपूर्ण करण्यासाठी रोजगार निर्मिती करण्याचा संकल्प घेत गोमय व पंचकव्यापासून विविध वस्तू बनवून आर्थिक समस्या पूर्ण करत आहेत. आज जवळ जवळ गावातील 25 ते 30 महिलांना ह्या कार्यातून रोजगार दिल्या जात आहे. तर नुकत्याच झालेल्या रक्षाबंधनासाठी तब्बल अडीच लाख रुपयांच्या गोमय राख्या गुजरात, उत्तराखंड,पूना, उज्जैन,नागपूर,व आपल्या पंचक्रोशीती व शहरी बाजारात विक्री केल्या.
आज गोमय धूप, जपमाळ, गणेशमूर्ती, गायत्री पिडांतक तेल, पंचगव्य साबण, पंचगव्य शाम्पू, गायत्री लाल दंतमंजन, गोमय हवन गौरी, दिपक, गोनाईल किचन तसेच घरातील वास्तुशांती पूरक शोभिवंत वस्तूंची निर्मिती केल्या जात आहे. त्यामुळे किन्ही नाईकच नव्हे तर पंचक्रोशीत सदर कार्यातून रोजगार निर्मिती व सुसज्ज गोपालन व्यवस्थापन करण्याचा मानस विनोद कोकाटे यांनी यावेळी त्यांच्या संवादातून समोर आला त्यामुळे पंचक्रोशीत सदर कार्याची स्तुती होत आहे.