सामाजिक

ज्ञानेश्वर माऊली शेजुळ – जनतेच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य!”सामाजिक-राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांमध्ये झंझावात ठरलेले नाव! सोयदेव गावाचा सुपुत्र आता जनतेचां आशेचा किरण!

जालना / रामदास कहाळे
ज्ञानेश्वर माऊली शेजुळ हे नाव आज केवळ सोयदेवपुरते मर्यादित राहिलेले नाही, तर संपूर्ण जालना जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक नकाशावर ठळकपणे उमटले आहे.
एक आदर्श शेतकरी, समाजाभिमुख कार्यकर्ता, आणि तळमळीने झटणारा भाजपचा निष्ठावान योद्धा म्हणून त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आहे.

आमदार बबनराव लोणीकर व राहुल भैया लोणीकर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना, त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, तरुण, वृद्ध – प्रत्येक घटकासाठी काम करणारा एक झपाटलेला चेहरा म्हणजे शेजुळ माऊली!

ते केवळ समस्या जाणून घेत नाहीत, तर त्या नेत्यांपर्यंत पोहोचवून मार्ग काढण्याचा ध्यास घेतात. आरोग्य शिबिरे असो, शेतकऱ्यांचे कर्जमाफी प्रश्न असो, की विविध योजनांची अंमलबजावणी – शेजुळ यांनी नेहमीच आघाडी घेतली आहे.

“हाच आमचा माणूस! हाच आमचा नेता!”

“शेजुळ माऊली यांना जिल्हा परिषदेत पाठवा, हा जनतेचा आदेश आहे मागणी नाही!”

गावागावातून, पान टपरीपासून ते सोशल मिडियापर्यंत एकच चर्चा आहे – ज्ञानेश्वर शेजुळ यांना आता मोठ्या व्यासपीठावर पाहण्याची वेळ आली आहे.

लोकांचा आवाज स्पष्ट आहे:
“जो सतत मैदानात असतो, तोच सभागृहात हवा!”
“जनतेसाठी लढणारा, जिल्हा परिषदेत बसणार!”

ज्ञानेश्वर माऊली शेजुळ यांचा उगम हा शेतकरी कुटुंबातला. पण त्यांच्या कार्याची व्याप्ती आता जालना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पसरली आहे.
त्यांच्या रूपाने एक प्रामाणिक, कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख नेतृत्व उभं राहत आहे, जे राजकारणाला समाजकारणाशी जोडत आहे.

ही निवडणूक केवळ जागेची नाही, ही निवडणूक आहे विश्वासाची!
शेतकऱ्याच्या मुलाने आता जिल्हा परिषद गाठावी, हीच जालना जिल्ह्याची भावना!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button