महाराष्ट्र

ठाकरे बंधू एकत्र आले तरी फरक पडणार नाही:संजय निरुपम यांचा दावा; बाळासाहेबांचे विचार सोडल्यानेच कामगारांनी नाकारल्याची टीका

  1. सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे आणि वारंवार भूमिका बदलणारे ठाकरे बंधू एकत्र आले तरी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत फारसा फरक पडणार नाही हे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून दिसून आले, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे उपनेते तथा प्रवक्ते संजय निरुपम यांनी शुक्रवारी केली. मुंबईतील बेस्ट पतपेढीची नुकतीच निवडणूक झाली. त्यात ठाकरे बंधूंच्या पॅनलचा दारूण पराभव झाला. संजय निरुपम यांनी शुक्रवारी या प्रकरणी येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंवर निशाणा साधला. तसेच त्यांच्या आघाडीमुळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काहीही फरक पडणार नसल्याचा दावा केला. ठाकरे बंधु एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल असे केले जाणारे दावे या निकालाने फोल ठरले, असा टोला निरुपम यांनी यावेळी लगावला. मराठी माणसांच्या मनात बाळासाहेब ठाकरेंनंतर आता एकनाथ शिंदे यांना स्थान आहे, असे ते म्हणाले. बेस्टच्या 12 हजार मतदारांनी ठाकरेंना नाकारले निरुपम पुढे म्हणाले की, बेस्ट पतपेढी निवडणुकीपूर्वी मुंबईत उबाठा आणि मनसेची युती करण्यात आली होती. मराठी मतांसाठी त्यांनी मराठी विरुद्ध हिंदी असा वाद निर्माण केला गेला. ठाकरे बंधू एकत्र आल्याने मुंबईचे राजकारण बदलेल. तसेच ठाकरे ब्रॅंडबाबत विजयाचे दावे केले जात होते, मात्र हे दावे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत फोल ठरले. पतपेढीच्या निवडणुकीत 21 जागांपैकी एकही जागा ठाकरे बंधुंना जिंकता आले नाही. या निवडणुकीत 83 टक्के मतदान झाले. बेस्टच्या 12 हजार मतदारांनी ठाकरे बंधूंना नाकारले, असे निरुपम म्हणाले. एकनाथ शिंदे हेच बाळासाहेबांचे वारसदार मुंबईत एकच ब्रॅंड तो म्हणजे हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे आहेत. बाळासाहेबांनंतर मुंबईतील मराठी माणसांच्या मनात शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्थान आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे खरे वारसदार एकनाथ शिंदे आहेत, असे निरुपम म्हणाले. मुंबई सर्वांना सामावून घेणारं शहर आहे. या शहरात भाषिक वाद करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना स्पष्टपणे नाकारले जाईल, असे बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीतून संदेश मिळाला आहे. मुंबईत उबाठाचे आमदार आणि खासदार हे मुस्लिम मतांवर निवडून आले. त्यांच्यापासून मराठी मतदार दुरावला आहे, असे ते म्हणाले. हे ही वाचा… ठाकरे बंधूंची आघाडी ट्रायल बॉलवरच नापास:मंत्री नीतेश राणे यांचा आमदार आदित्य ठाकरे यांना टोला; BDD चाळीवरून साधला निशाणा मुंबई – भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंच्या राजकीय आघाडीची खिल्ली उडवली आहे. या प्रकरणी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांची आघाडी ट्रायल बॉलवरच नापास झाल्याचा खोचक टोला हाणला आहे. वाचा सविस्तर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button