सिंदखेड राजा येथे आज सर्वपक्षीय निषेध निवेदन सर्व पक्षातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव राजे जाधव यांचे आवाहन

सिंदखेड राजा/ प्रतिनिधी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेतकरी नेते श्री विजय भैया गाडगे पाटील यांच्यावर झालेल्या अमानुषपणे मारहाण करून मारण्याच्या प्रयत्न केला असून त्यावर 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याच्या मागणी साठी आज 22 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तहसील सिंदखेड राजा कार्यालयासमोर उपस्थित राहण्याचे आवाहन अशोकराव राजे जाधव यांनी केले आहे.
एकीकडे पावसाविना उघडे पडलेले पिके करपत आहेत.
शेतकरी हवालदिन झाला आहे सरकारने आश्वासन देऊनहीं पीक विमा मिळत नाही.
रोज सरासरी 8 (आठ) शेतकरी आत्महत्या करताहेत दुसरीकडे निगर्कट्ट सरकार व त्यातील कृषी मंत्रालय शेतकऱ्याशी काहीही देणे घेणे असे वागत आहे. काळजी दिसत नाही किंवा समस्या सोडण्यासाठी प्रयत्न दिसत नाहीत वरून शेतकऱ्यांची खूप चेष्टा करत राज्याच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज न उठवतात पत्त्याचा डाव मांडला या बाबीचा विरोध निषेध करत कृषीमंत्र्याच्या राजीनामागत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लोकशाही मार्ग निवेदन दिले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या युवा प्रदेशाध्यक्ष प्रवक्ता सुरूज चव्हाण व त्याच्या साथीदारानी छावाच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्यांना बेदम जिवे मारण्याचा प्रयत्न केला हे राज्याच्या संस्कृतीला लोकशाहीला अशोभनीय आहे .व राज्यात हुकूमशाही प्रस्थापित करणारे आहे म्हणून सरकार च्या या बालिश कृषीमंत्र्याचे गुंड सुरज चव्हाण चा जाहीर निषेध करण्यासाठी आणि सहभागी गुंडावर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासाठी सर्वपक्षीय संघटनेच्या वतीने भव्य निषेध निवेदन सादर करण्यात येत आहे तरी यावेळी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन छावा संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी केले आहे