. “सवडदवर पावसाचा कहर – शेतजमीन खरडली, रस्ता वाहून गेला; शेतकऱ्यांसाठी योगेशभाऊ धावले मदतीला!”

सवडद गाव शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचा तडाखा – रस्ता वाहून गेला, पिकांचे प्रचंड नुकसान! योगेशभाऊ जाधव धावून पोहोचले मदतीला
सिंदखेडराजा | प्रतिनिधी सिंदखेडराजा मतदारसंघातील मौजे सवडद गावावर आभाळ फाटून कोसळले. सलग अतिवृष्टीमुळे शेतजमीन खरडून गेली, शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, गावातील मुख्य रस्ता पूर्णपणे धुऊन निघाला. या भीषण परिस्थितीत गावातील नागरिक आणि शेतकरी अक्षरशः उघड्यावर पडले आहेत.
या संकटाच्या काळात शिवसेना नेते मा. योगेशभाऊ जाधव स्वतः धावून सवडदला पोहोचले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली तसेच रस्त्याचे झालेल्या नुकसानीचे गांभीर्याने परीक्षण केले.
यावेळी त्यांनी स्पष्ट शब्दांत प्रशासनाला सूचना दिल्या की –
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेनं तात्काळ पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा.
गावजोड रस्तादुरुस्तीचा पंचनामा तातडीने करावा.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि नागरिकांना शासनाकडून भरघोस मदत मिळावी.
ग्रामस्थांच्या डोळ्यांत अश्रू, तर योगेशभाऊंच्या उपस्थितीने दिलासा –
अचानक आलेल्या या आपत्तीने गावकऱ्यांमध्ये हताशा निर्माण झाली होती. मात्र योगेशभाऊ जाधव यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दिलासा दिला. त्यांनी शासन पातळीवर पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
या वेळी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, महसूल विभागाचे अधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.