आरोग्य

आओ गाव चले 2025″चा धडाकेबाज शुभारंभ!दिंनापूरमध्ये तब्बल 400हून अधिक गावकऱ्यांची आरोग्य तपासणी; रक्त, डोळे, हाडे, आणि हृदय तपासणीपासून मोफत औषधे वाटपापर्यंत सेवा!

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी):आरोग्य सेवेला गावपातळीवर नेण्याचा ध्यास घेत “आओ गाव चले 2025” या उपक्रमाचा शानदार शुभारंभ दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी पैठण तालुक्यातील दिंनापूर गावात पार पडला.या भव्य मोफत आरोग्य शिबिरात तब्बल २२ वरिष्ठ डॉक्टरांनी आपली सेवा विनामूल्य दिली. यामध्ये हाडांचे, त्वचारोग, बालरोग, डोळे, महिलाविशेष, कान-घसा-नाक, व मेडिसिन या सर्व विभागांचा समावेश होता. शिबिरातील ठळक बाबी : ४००हून अधिक रुग्णांची तपासणी हाडांचे १२१ रुग्ण, डोळ्यांचे ७६, त्वचेचे ६१ रुग्ण १००हून अधिक महिलांची रक्ततपासणी – त्यातील २०% मध्ये हिमोग्लोबिन कमी! ३०० पेक्षा अधिक साखर असलेले रुग्ण प्रथमच निदान झाले; तत्काळ औषधोपचार सुरू ENT टीमकडून मोफत ऑडिओमेट्री (कर्णशक्ती चाचणी)डोळ्यांसाठी ऑटो रिफ्रॅक्टोमीटर तपासणी सर्व गरजू रुग्णांना मोफत औषधे वितरीत आरोग्य जनजागृती रॅलीने झाला कार्यक्रमाचा उत्साही प्रारंभ!गावात एक वेगळाच उत्साह संचारला – आरोग्याच्या घोषणा, जनजागृतीचे फलक, आणि गावकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद हे दृश्य प्रेरणादायी ठरले.प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन:उद्घाटन – डॉ. सिद्धेश्वर भोरे (DYSP, पैठण) आणि श्री. शेलके (पोलीस निरीक्षक, बिडकीन)अध्यक्षीय भाषण – डॉ. अनुपम टाकळकर: “हे एकदाचं शिबिर नाही — आम्ही ५ गावे दत्तक घेतली आहेत; वर्षभर आरोग्य सेवा देणार आहोत.”प्रमुख पाहुणे – IMA चे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत गाडे, कोषाध्यक्ष डॉ. शिवाजी पोल, संयुक्त सचिव डॉ. गितेश डाळवी, डॉ. संभाजी चिंताळे, डॉ. शाहाजी तवारेआभार प्रदर्शन – IMA सचिव डॉ. योगेश लक्कस ज्यांच्या प्रयत्नांनी शिबिर गाजलं – हे आहेत आरोग्यसेवकांचे खरे हिरो:डॉ. यशवंत गाडे, डॉ. अनुपम टाकळकर, डॉ. योगेश लक्कस, डॉ. अंजली गाडे, डॉ. असावरी टाकळकर, डॉ. इश्रत बारूदवाला, डॉ. रघुवेंद्र चकुरकर, डॉ. उर्मिला चकुरकर, डॉ. संभाजी चिंताळे, डॉ. शाहाजी तवारे, डॉ. निशा तवारे, डॉ. गौरव साळवे, डॉ. गितेश डाळवी, डॉ. रश्मी डाळवी, डॉ. शिवाजी पोल, डॉ. राहुल बडे, डॉ. मृत्युंजय बिलगी, डॉ. संजय खंडागळे, डॉ. हर्षवर्धन गुणाळे, डॉ. अजिंक्य राजे, डॉ. मिन्हाज, डॉ. जावेद. हे एक आरंभच आहे! ‘आरोग्यपूर्ण भारतासाठी गाव पातळीवरचा हा बदलच खरा महासत्ता बनवेल!’– डॉ. अनुपम टाकळकरअध्यक्ष, IMA छत्रपती संभाजीनगर – डॉ. योगेश लक्कसमा. सचिव, IMA छत्रपती संभाजीनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button