वृक्षारोपण ते विद्यार्थ्यांचा सत्कार, सिंदखेडराजात समाजकार्याची उधळण!कमलताई मेहेत्रे यांची ५८ वी जयंती निमित्ताने आयोजन

सिंदखेडराजा (रामदास कहाळे) –
लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष स्व. कमलताई छगनराव मेहेत्रे यांच्या ५८व्या जयंतीनिमित्त दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी सिंदखेडराजा नगरीत समाजकार्याचा एक आगळावेगळा व स्फूर्तिदायक सोहळा पार पडणार आहे.
या विशेष दिनाचे औचित्य साधत खंडोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, शालेय वस्तूंचे वाटप, तसेच स्वच्छता दूत महिलांना साडी-चोळी व पुरुषांना सन्मानचिन्ह म्हणून ड्रेस वाटप असे अनेक उपक्रम साजरे केले जाणार आहेत.
हा कार्यक्रम सावता भवन, नगर परिषद प्रांगण, मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे दुपारी २.३० वाजता होणार असून, समस्त मेहेत्रे व झोरे परिवार यांच्यातर्फे या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
स्व. कमलताई मेहेत्रे यांचे समाजहितासाठीचे योगदान, त्याग व कार्यशक्ती आजही अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या स्मृतीदिनी समाजोपयोगी उपक्रम राबवून त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेण्याचा हा स्तुत्य उपक्रम नक्कीच कौतुकास पात्र आहे.