अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसगट नुकसान भरपाई द्या . ऊबाठाचे . शिवसेना तालुका प्रमुख दादाराव खार्डे यांची तहसीलदार यांच्या कडे मागणी

देऊळगाव राजा/ राजु भालेराव देऊळगाव राजा तालुक्यात पंधरा दिवसापासून संततधार पावसामुळे शेतकऱ्यां च अतोनात नुकसान झाले असून त्याचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे देऊळगाव राजा तालुका अध्यक्ष दादाराव खार्डे यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी तहसीलदार यांच्या कडे केली आहे
त्याचबरोबर ई पिक पाहणी करताना शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहॆ त्यासंदभात योग्य ती उपाय योजना करण्यात यावी, व नदी तसेच नाल्या च्या पुरामुळे ज्या जमीन खरडून गेल्या त्यामुळं पिकाचे जे नुकसान झाले त्याचे सुद्धा पंचनामे करुन त्यांना तात्काळ मदत करावी यासाठी निवेदन देऊन तहसीलदार मॅडम देऊळगाव राजा यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली, यावेळी शिवसेना ता. प्रमुख दादाराव खार्डे, मा. नगरध्यक्ष गोविंदराव झोरे,जेष्ठ शिवसैनिक वसंत आप्पा खुळे , शिवसेना शहर प्रमुख अजय शिवरकर , युवासेना ता. प्रमुख नितेश देशमुख , युवा नेते राजू नागरे, हरिभाऊ वाघ अविनाश डोईफोडे, गजानन घुगे , विठोबा पवार , सदाशिव मुख्यद्दल, मोहन खांडेभराड योगेश मिसाळ, तोसिफ कोटकर किशोर जमादार , पवन बोराटे, निलेश टेकाळे, गजानन चित्ते, रामेश्वर जायभाये , प्रदीप शेळके , विनोद शेळके, राम कापसे, मच्छिन्द्र मुख्यद्दल संकेत उबाळे पवन मुंडलिक, योगेश म्हस्के यासह असंख्य शिवसैनिक उपस्तित होते.