सातासमुद्रपार अमेरिकेतील २१ व्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा भिमपुत्र पोलीस रविंद्र साळवे !

बुलडाणा,(बाबासाहेब जाधव)- छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) ग्रामीण पोलीस दलातील भिमाच लेकरू भोकरदन तालुक्यातील ग्राम कोढा जांगीर येथील भूमिपुत्र हेडकॅान्स्टेबल रविंद्र साळवे यांनी अमेरिकेतील बिरमिंघम, अलाबामा (युएसए) येथे २६ जून ते ७ जूलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या ” वर्ल्ड पोलीस ॲण्ड फायर गेम्स ” येथील अमेरिकेतील बिरमिंघम,या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत रवींद्र साळवे यांनी सुवर्णपदक पटकावले.
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले आणि सध्या वैजापूर पोलीस ठाण्यात नियुक्त हेडकॉन्स्टेबल रवींद्र साळवे यांनी पावर लिफ्टिंग या स्पर्धेत सुवर्णपदक तर बेंच प्रेस या स्पर्धेत कास्यपद जिंकले.
त्यांनी सातासमुद्रापार अमेरिकेच्या भूमीवर भारताची मान उंचावून तिरंगा फडकावून भारताचा गौरव उंचावला.
या स्पर्धेसाठी जगभरातून ९० पेक्षा अधिक देशांचा सहभाग होता.
या स्पर्धेत ७१ हून अधिक देशांमधील पोलीस व अग्निशमन दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
जगभरातील पोलीस दलात कौशल्य, फिटनेस आणि शौर्य याचे प्रतीक असलेल्या या स्पर्धेत रवींद्र साळवे भीमसैनिक यांची कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
रवींद्र साळवे यांनी यापूर्वीही जागतीक स्पर्धेत नोव्हेंबर २०२४ मध्ये कोलंबिया, दक्षिण अमेरिका येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावले होते. त्यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीने भारताचे नाव या भिमपुत्राने जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे.
रवींद्र साळवे यांच्या या यशाबद्दल भारताचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी त्यांच्या मनकी बात या कार्यक्रमामध्ये त्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले. तसेच विविध पोलीस अधिकारी, सहकारी आणि वरिष्ठांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
त्यांना पुढील वाटचालीसाठी मा.विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्रा,
मा. पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड,पोलीस उपअधीक्षक श्रीमती अन्नपूर्णा सिंग मॅडम, उपविभागीय पोलीस अधीक्षक भागवत फुंदे,
उपविभागीय पोलीस अधीक्षक पूजा नागरे मॅडम,
पोलीस निरीक्षक रवीकुमार दरवडे, पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले,
जगेश दैत्य,सुरेश वर्मा, सौरभ कल्लोळे,वैभव थोरात इत्यादींनी पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून नातेवाईक, मित्रमंडळी, खेळप्रेमी कडून त्यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे.त्यांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
रविंद्र साळवे यांनी ८३ किलो वजन गटात स्वर्ण पदक व बेंच प्रेस या खेळ प्रकारात कस्यपदक प्राप्त केले, विदेशात भारताचा तिरंगा झेंडा झळकवत संपूर्ण जगात भारताचे वर्चस्व कायम केले त्याबद्दल मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य श्रीमती रश्मी शुक्ला यांच्या हस्ते त्यांना पदक,अलंकरण देऊन सत्कार करण्यात आला.
त्यांनी केवळ पोलीस दलाचं नव्हे तर महाराष्ट्र आणि संपूर्ण भारताचं नाव जागतिक स्तरावर उज्वल केलं आहे.
त्यांचं हे यश आजच्या पोलीस दलातील जवानांना प्रेरणादायी ठरणार आहे.