वर्षावासाची वंदनीय परंपरा आडगाव राजा येथे पुन्हा जोमात सुरू — बौद्ध अनुयायांची पर्वणी”

आडगाव राजा | प्रतिनिधी बुद्ध विहारात सुरू झालेल्या वर्षावासाच्या प्रारंभाने आडगाव राजा हे गाव पुन्हा एकदा धम्मज्योतीने उजळून निघाले आहे. २० वर्षांपासून अखंड चालू असलेल्या या धम्मपरंपरेचा दिव्य वारसा यंदाही पुढे नेला जात आहे.आषाढ पौर्णिमेच्या दिवशी, बौद्ध अनुयायांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवशी श्रामणेऱ सुरेंद्र कहाळे व अमोल कहाळे व उपासक योगेश कहाळे यांनी बुद्ध व त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण आरंभ करून या धम्म पर्वाची सुरुवात केली. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या दोन पौर्णिमांदरम्यान सलग ३ महिन्यांचा ‘वर्षावास’ काळ हा धम्मसाधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.या काळात बुद्ध विहारात दररोज बौद्ध उपासक व उपासिका यांची गर्दी होत असून, शांती, अहिंसा आणि प्रज्ञा या त्रिसूत्रीवर आधारित बौद्ध शिकवणीचे सतत स्मरण होत आहे. संपूर्ण परिसरात शील, समाधी आणि प्रज्ञेचा सुगंध दरवळत आहे.या वर्षावास उपक्रमामागे समाजातील नैतिक अधिष्ठान, आध्यात्मिक उन्नती आणि संघ एकतेचे बळ वाढवण्याचा उद्देश असून, धम्मचक्र प्रवर्तन दिनाकडे नेणारी ही वाटचाल समाजप्रबोधनाचं उत्कृष्ट उदाहरण ठरत आहे.”धम्माला समर्पित एक निस्वार्थ सेवा — आडगाव राजा बुद्ध विहार वर्षावासात पुन्हा एकदा श्रद्धेचा सागर उसळला!
“विशेष वैशिष्ट्ये:२० वर्षांची अखंड परंपराबुद्ध व धम्म ग्रंथांचे संध्याकाळ पठणग्रामस्थ व उपासकांचा सक्रीय सहभागशांती, सदाचार आणि धम्मवाणीचे जागरण