सामाजिक

सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत सिंदखेडराजा तालुक्यात सुरू असलेल्या कामाची चौकशी करण्याची बबन सरकटे यांची मागणी !

बुलढाणा/ सचिन खंडारे अतिशय दुर्लक्षित विभाग असलेल्या सामाजिक वनीकरण विभाग सिंदखेडराजा या सामाजिक वनीकरण विभाग सिनखेडराजा परिक्षेत्र अंतर्गत काही वनरक्षक यांनी आपल्या मर्जीनुसार कामे तालुका लागवड अधिकारी यांच्या माध्यमातून घेऊन मलई लाटण्याचा प्रकार घडल्या असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, सन 2023 / 24 आणि 25 Five कालावधीमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या कामांमध्ये अनियमितता झाली असून संबंधित विभागाने चौकशी करण्याचे मागणी सामाजिक कार्यकर्ते बबन सरकटे यांनी केली आहे . सविस्तर वृत्तांत असं की सामाजिक वनीकरण विभाग सिनखेडराजा अंतर्गत ‘ नाईक नगर ते वसंत नगर, सुलजगाव ‘ उमरद – ते आडगाव राजा ‘ चिंचोली ते सोयंदेव फाटा, या गावांमध्ये दुतर्फा वृक्ष लागवड मध्ये घोटाळा झाला असून जे मजूर स्थानिक कामाला नसताना सुद्धा इतर मजुरांच्या नावे पैसे काढून ते लाटण्याचा प्रकार घडला आहे, संबंधित विभागाने मस्टर काढताना स्थानिक कामगारांना प्राधान्य देणे अग्रक्रम असते मात्र मर्जीतील लोकांच्या नावे मस्टर काढून पैसे काढण्याचा प्रकार सुद्धा घडला असून संबंधित विभागीय अधिकारी सामाजिक वनीकरण विभाग बुलढाणा यांनी चौकशी करून संबंधित लागवड अधिकाऱ्याची खाते न्याय चौकशी करावी अशी मागणी बबन सरकटे यांनी दिनांक ११ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे, पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे त्यामुळे विभागीय सामाजिक वनीकरण विभाग काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button