सामाजिक

कास्ट्राईब शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा संपन्न

साखर खेर्डा/ दर्शन गवई काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची सभा द्वारकादास सभागृह जालना येथे दुपारी बारा वाजता सुरू झाली.या सभेच्या अध्यक्षस्थानी बी.डी.धुरंधर (कार्याध्यक्ष,म.राज्य)उद्घाटक मा श्री सुरेश तांबे साहेब (महासचिव कास्ट्राईब कर्मचारी महासंघ म राज्य )मार्गदर्शक मा डॉ श्री सतिषजी सातव (शिक्षण उपनिरीक्षक छ संभाजी नगर विभाग हे होते.महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मा श्री सुरेश तांबे साहेब व इतर पदाधिकारी यांचे हस्ते करून सभेचे उद्घाटन करण्यात आले.म राज्याचे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मा श्री सतिष कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राज्य कार्यकारिणी सभेचा उद्देश स्पष्ट केला व सभेमध्ये घेण्यात येणाऱ्या ठरावाचे वाचन केले.मार्गदर्शनपर संबोधित करताना मा डॉ श्री सतिषजी सातव म्हणाले की सदर संघटना संविधानिक पध्दतीने चालत असल्याने आम्हाला संघटनेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात उत्साह निर्माण होतो व प्रेरणा मिळते कारण सदर संघटना ही कधीही वयक्तिक प्रश्न न मांडता समुहाचा प्रश्न मांडते. तसाही सातव साहेबांचा स्वभाव गूण हा सहकार्याचाच मी एकदा छ.संभाजी नगर येथे शिक्षण उपसंचालकाच्या कार्यालयात काही कामा निमित्त गेलो असता तेथे साहेबांची भेट झाली मला तिथे सर्वकाही नवख असतांना सुध्दा त्यांच्या सहकार्य भुमिकेतून ते आपलेसे झाले व ते आजतागायत सुध्दा आपलेसे आहेतच व या संदर्भाच्या माध्यमातून काल कार्यक्रम स्थळी भेट झाली असता दोघांनाही सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही चला माणसं जोडणच हीच कमाई असते.पूढे मार्गदर्शनपर भाषणे श्री गणेश दादा मडावी,श्री नागसेन धनवे, श्री सुमित भुईगळ,श्री परसराम गोंडाणे, श्रीमती माया देवी गायकवाड यांची झाली.अध्यक्षिय भाषणात श्री बि डी धुरंधर म्हणाले की संघटना ही प्रत्येक सभासदाच्या कार्यावर मोठी होत असते त्यामुळे संघटनेचा सदस्य हा कार्यक्षम व शिस्तबद्ध असावा.येत्या एक आक्टोबर ला होणाऱ्या आपल्या वार्षिक अधिवेशना साठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.सर्व जिल्हा अध्यक्षांचा आढावा घेण्यात आला व शेवटी राष्ट्रगीत घेऊन येथेंच जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये श्री राजेश सदावर्ते (मराठवाडा विभागीय अध्यक्ष का शि संघटना)श्री संतोष गवई (मराठवाडा विभागीय सरचिटणीस का.शि.संघटना) श्री सुभाष म्हस्के ( जिल्हा अध्यक्ष तथा नवनिर्वाचित राज्य पदाधिकारी) व त्यांचे सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले नियोजन फार छान होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री गौतम मोरे मा.जिल्हाध्यक्ष का.शि.संघटना यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले मा श्री सतिष कांबळे सर राज्य सरचिटणीस का.शि संघटना यांचे मार्गदर्शनाखाली सदर सभा उद्देश पुर्ण सफल झाली.अशाच सभा एक आक्टोबर च्या अधिवेशन पुर्व तयारी साठी तालुका व जिल्हास्तरावर सर्व पदाधिकार्यांनी घेऊन सहकार्य करावे सभेसाठी बुलढाणा जिल्ह्यातून पदाधिकारी दिलीप दादा खंडारे (राज्य कार्यकारिणी सदस्य), अरुण सावंग (अमरावती विभागीय अध्यक्ष), शेषराव वाकोडे जिल्हाध्यक्ष (काष्ट्राईब शिक्षक संघटना बुलढाणा), प्रदीप इंगळे( जिल्हा सरचिटणीस बुलढाणा), कैलास तेलंग, संदीप वानखडे( जिल्हा प्रसिद्धीप्रमुख प्रमुख), गणेश वाघ आणि सुनील गवई उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button